मुंबईत डबेवाल्यांची फुटबॉल किक


SHARE

फिफा अंडर १७ विश्वचषकाच्या निमित्ताने देशात केंद्र सरकारद्वारे 'मिशन १०० मिलियन' हा उपक्रम राबवण्यात येत आहे. या उपक्रमाच्या जोडीला महाराष्ट्र सरकार देखील 'मिशन वन मिलियन' उपक्रम राबवत असून शुक्रवारी सकाळी ९ वाजता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि क्रीडा मंत्री विनोद तावडे यांच्या हस्ते या स्पर्धेचे उदघाटन करण्यात आले.

या उक्रमात मोठ्या संख्येने शाळकरी मुलांनी सहभाग घेतल्याने अत्यंत उत्साहात ही स्पर्धा पार पडली. विशेष म्हणजे यामध्ये मुंबईच्या डबेवाल्यांनी देखील सहभाग घेतला होता. ही स्पर्धा सकाळी बॉम्बे जिमखाना येथे पार पडली.

आजचा तरुण हा मोबाईल आणि सोशल मीडिया, इंटरनेट यात हरवून मैदानी खेळ विसरत जात आहे. जणू काही त्यांना याचे व्यसन जडले आहे. त्यांना मैदानी खेळाचे महत्व पटवून देण्यासाठी आज आम्ही देखील मैदानात उतारत आहोत, असे डबेवाले यांनी सांगितले. मैदानी खेळामुळे प्रकृती चांगली राहते, मुले ऑनलाइनच्या विळख्यातून बाहेर पडतात, त्यामुळे मुलांना मैदानी खेळ खेळण्यास प्रोत्साहीत केले पाहिजे, असे सुभाष तळेकर मुंबई डबेवाला असोसिएशनचे प्रवक्ते यांनी सांगितले.

महाराष्ट्र मिशन १ मिलियन फुटबॉलच्या अभिनव उपक्रमात राज्यात २५ लाख ६२ हजार ३५३ विद्यार्थी-विद्यार्थींनी फुटबॉल खेळले. ई-गॅझेटचा मोह टाळा दूर रहा आणि मैदानावर फुटबॉल खेळा"...व्हॉट्स अप, फेसबुकाचा मोह टाळा, मैदानावर फुटबॉल खेळा, व्हिडीओ गेमचा मोह टाळा, मैदानावर फुटबॉल खेळा... या संदेशाचा प्रत्यय आज संपूर्ण महाराष्ट्राने घेतला. महाराष्ट्र मिशन १ –मिलियन" या फुटबॉल खेळाच्या महोत्सवाचा शुभारंभ झाल्यानंतर दिवसभरात लाखो विद्यार्थी आणि विद्यार्थ्यीनींनी राज्यभरात फुटबॉल खेळण्याचा मनसोक्त आनंद लुटला. 

सायंकाळी ५ वाजेपर्यंत महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांमध्ये २५ लाख ६२ हजार ३५३ विद्यार्थी आणि विद्यार्थींनींनी प्रत्यक्ष फुटबॉल खेळला. यामध्ये १६ लाख २९ हजार १७९ मुलांचा तर ९ लाख ३३ हजार १७४ मुलींचा सहभाग होता. राज्यात १ मिलियन मिशनचे लक्ष २.५ मिलियनपर्यंत पोहोचवत मुला-मुलींनी अतिशय उत्साहीपणे फुटबॉल खेळला. अशी माहिती राज्याचे क्रीडामंत्री विनोद तावडे यांनी संध्याकाळी झालेल्या पत्रकार परिषदेत बोलताना सांगितले.डाऊनलोड करा Mumbai live APP आणि रहा अपडेट

मुंबईशी संबंधित प्रत्येक बातमी आणि अपडेट मिळवण्यासाठी Mumbai live च्या फेसबुक पेजला लाईक करा

(खाली दिलेल्या कमेंट बॉक्समध्ये तुमच्या प्रतिक्रिया अवश्य द्या)

 


संबंधित विषय
ताज्या बातम्या