'ट्रिपल एच'नं मुंबई इंडियन्सला दिला चॅम्पियनशीप बेल्ट

Mumbai
'ट्रिपल एच'नं मुंबई इंडियन्सला दिला चॅम्पियनशीप बेल्ट
'ट्रिपल एच'नं मुंबई इंडियन्सला दिला चॅम्पियनशीप बेल्ट
See all
मुंबई  -  

यंदा रस्त्यांवर खड्डे पडणार नाहीत किंवा पावसाळ्यातही सर्व लोकल वेळेवर धावणार, अशी एका ना अनेक आश्वासनं डोळ्यांदेखत हवेत विरताना मुंबईकरांनी नुकतीच अनुभवली आहेत. पण दिलेलं वचन पाळायचं कुणाकडून शिकायचं असंल, तर ते डब्ल्युडब्ल्युई सुपरस्टार ट्रिपल एचकडून शिकावं. खासकरून तुम्ही मुंबई इंडियन्स क्रिकेट टीमचे फॅन्स असाल, तर ट्रिपल एचनं पूर्ण केलेल्या आश्वासनामुळं तुम्हाला नक्कीच आनंद होईल.

'वर्ल्ड रेसलिंग इंटरटेनमेंट' अर्थात WWE चा सुपरस्टार ट्रिपल एचनं २०१७ मध्ये तिसऱ्यांदा आयपीएलचे विजेते ठरलेल्या मुंबई इंडियन्सला खास भेट देण्याचं आश्वासन दिलं होतं. ही भेट नेमकी काय आहे, हे त्यावेळी त्यानं सांगितलं नव्हतं. पण नुकतचं त्यानं आश्वासन पूर्ण करत मुंबई इंडियन्सला आपला शानदार 'चॅम्पियनशीप बेल्ट' भेट म्हणून दिला आहे.ट्रिपल एचनं आपल्या ऑफिशिअल ट्विटर अकाऊंटवर याबाबत एक ट्विट देखील केलं आहे. या ट्विटमध्ये तो म्हणतो की, मी माझं आश्वासन पूर्ण केलं आहे. WWE टायटल बेल्ट तुमच्यासाठी पाठवला आहे.तब्बल १४ वेळा विश्वविजेता राहिलेला ट्रिपल एच सध्या डब्ल्युडब्युईचा सीओओ देखील आहे. त्यानं पाठवलेल्या चॅम्पियनशीप बेल्टच्या दोन्ही बाजूला मुंबई इंडियन्सचा लोगो लावण्यात आलेला आहे. हा बेल्ट मुंबई इंडियन्सपर्यंत पोहोचला असून टीमचा कॅप्टन रोहित शर्मानं हा बेल्ट उंचावून ट्रिपल एचचे आभार मानलेत.हे देखील वाचा -

घरातही जडेजाची अष्टपैलू कामगिरीडाऊनलोड करा Mumbai live APP आणि रहा अपडेट

मुंबईशी संबंधित प्रत्येक बातमी आणि अपडेट मिळवण्यासाठी Mumbai live च्या फेसबुक पेजला लाईक करा

(खाली दिलेल्या कमेंट बॉक्समध्ये तुमच्या प्रतिक्रिया अवश्य द्या)  

 


Loading Comments

संबंधित बातम्या

© 2018 MumbaiLive. All Rights Reserved.