नववर्षदिनी व्हॉट्सअॅपवर शुभेच्छांचा महापूर, २४ तासांत १०० अब्ज मेसेज

सध्याच्या जगात संपर्काचं महत्त्वाचं साधन म्हणजे व्हॉट्सअॅप. सण, उत्सव, वाढदिवस, नवीन वर्षाच्या शुभेच्छा व्हॉट्सअॅप दिल्या जातात. नवीन वर्षाच्या पहिल्या दिवशी तर व्हॉट्सअॅपवर मेसेजचा महापूर आला होता.  नवीन वर्षाच्या शुभेच्छा देणारे तब्बल १०० अब्ज मेसेज व्हॉट्सअॅपवर संपूर्ण जगभरात पाठवण्यात आले. 

प्रत्यक्ष काॅल करण्यापेक्षा मेसेज करून शुभेच्छा देण्यावर प्रत्येकाचा भर असतो. नवीन वर्षदिनी २४ तासांमध्ये तब्बल १०० अब्ज मेसेज जगभरात पाठवण्यात आले होते. भारतात ३१ डिसेंबर रोजी युजर्सने २० अब्जाहून अधिक मेसेज व्हॉट्सअॅपवर पाठवले आहेत. व्हॉट्सअॅपने दिलेल्या माहितीतून ही बाब समोर आली आहे. 

व्हॉट्सअॅपने दिलेल्या माहितीनुसार, जगभरात १०० अब्ज मेसेज पाठवण्यात आले असून १२ अब्ज फक्त फोटो असलेल्या शुभेच्छा होत्या. ३१ डिसेंबर रोजी पाठवण्यात आलेल्या मेसेज हे नवीन वर्षाच्या शुभेच्छा देणारे असतील असं व्हॉट्सअॅपने म्हटले आहे. वर्षभरात व्हॉट्सअॅपवर टेक्सट मेसेज, स्टेट्स, पिक्चर मेसेज, कॉलिंग आणि व्हॉइस नोट्स या फिचर्सचा सर्वाधिक वापर झाला असल्याचे कंपनीने म्हटले आहे. 


हेही वाचा -

३१ डिसेंबरच्या पार्टीच्या हँगओव्हरवर 'या' अफलातून मिम्स

डार्कमोड फिचर व्हॉट्सअॅपवर लवकरच येणार


पुढील बातमी
इतर बातम्या