Advertisement

डार्कमोड फिचर व्हॉट्सअॅपवर लवकरच येणार

काही युजर्सनी या फिचरचा वापरही सुरू केलाय.

डार्कमोड फिचर व्हॉट्सअॅपवर लवकरच येणार
SHARES

व्हॉट्स अॅप युजर्ससाठी गुड न्यूज आहे. बहुप्रतीक्षित असं डार्कमोड फिचर व्हॉट्सअॅपवर सुरू झालं आहे. काही युजर्सनी या फिचरचा वापरही सुरू केलाय. हे फिचर अँड्रॉइडवर आलंय. पण iOS वरील युजर्सना अजून वाट पाहावी लागले. iOS वरील फिचर डेव्हलप केलं जातंय. iOSवरील डार्कमोड फिचरही हळूहळू अंमलात आणलं जाईल. पण सध्या ते डेव्हलप होत आहे आणि तात्पुरते म्हणजे अनस्टेबल स्वरुपात आहे

डार्कमोडची टेस्टींग सुरू

व्हॉट्सअॅपचे डार्कमोड फिचर सध्या काही मोजक्या युजर्सना तात्पुरत्या स्वरूपात उपलब्ध करून देण्यात आलं आहे. सर्व युजर्सना हे फिचर उपलब्ध करून देण्यापूर्वी कंपनी त्याची सर्व स्तरावर चाचणी करत आहे. काही त्रुटी आढळून आल्यास त्या दुरुस्त करण्यात येणार आहे. डार्कमोड हे फिचर कायम स्वरुपी कधीपर्यंत उपलब्ध करून दिलं जाईल, याची अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही.


येणार डिलीट मेसेज फिचर

डार्कमोडसोबतच व्हॉट्सअॅप युजर्स डिलीट मेसेज फिचरच्याही प्रतीक्षेत आहेत. आपण पाठवलेला मेसेज युजर्सना ऑटोमेटीक डिलीट करता येणार आहे. युजर्स आपला मेसेज ऑटोमेटीक डिलीट करण्याचा कालावधी ठरवू शकणार आहेत. सुरुवातीला कंपनी अँड्रॉइड युजर्ससाठी हे फिचर आणणार आहे.



हेही वाचा

व्हॉट्स अॅपचे ३ नवीन फीचर लाँच

'या' कारणामुळे ट्वीटरची ६ हजाराहून अधिक खाती बंद


संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा