Advertisement

'या' कारणामुळे ट्वीटरची ६ हजाराहून अधिक खाती बंद

जवळपास ८८ हजार खाती स्पॅम पसरवणारी ओळखली गेली आहेत. या खात्यांमधून विशिष्ट विषयावर स्पॅम सामग्री दिली जाते.

'या' कारणामुळे ट्वीटरची ६ हजाराहून अधिक खाती बंद
SHARES

ट्विटरनं ६ हजाराहून अधिक खाती बंद केली आहेत. हे सर्व वापरकर्ते त्याच्या धोरणाचे उल्लंघन करत होते आणि इतर वापरकर्त्यांना लक्ष केंद्रीत करत त्यांना ट्रोल करत होत होते. यासाठीच त्यांची खाती बंद करण्यात आली आहेत

जवळपास ८८ हजार खाती स्पॅम पसरवणारी ओळखली गेली आहेत. या खात्यांमधून विशिष्ट विषयावर स्पॅम सामग्री दिली जाते. यापैकी ५ हजार ९२९ खाती हटवली गेली आहेत. तत्पूर्वी यावर्षी ऑगस्टमध्ये ट्विटरनं दोन लाख चिनी अकाउंट्स बंद केली होती, जी हांगकांग निषेधाशी संबंधित होती. २०१६ साली देखील अमेरिकेच्या निवडणुकांच्या वेळी बरीच खाती बंद केली गेली होती, जी रशियाची होती. ही खाती राजकीय पक्षांच्या फायद्यासाठी वापरली जात होती.

सुधारित नागरिकत्व कायदा (सीएए) विरोधात अफवा रोखण्याचे काम सध्या पोलिस करत आहेत. अफवा पसरविणाऱ्या वापरकर्त्यांच्या खात्यांची माहिती देण्याचं आवाहनही पोलिसांनी लोकांना केलं आहे. दिल्ली पोलिसांनी ट्विटर, फेसबुक आणि इन्स्टाग्राम यांना त्यांच्या व्यासपीठावर आक्षेपार्ह सामग्री काढण्यासाठी पत्र लिहिली आहेत



हेही वाचा

तुमचं ट्वीटर अकाऊंट अपडेट करा, नाहीतर...

पासवर्ड हॅक झाल्यास गुगल देणार अलर्ट

Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा