Advertisement

तुमचं ट्वीटर अकाऊंट अपडेट करा, नाहीतर...

हॅकर्स तुमच्या अकाऊंटमधून ट्विट आणि मेसेज देखील करू शकतात. हॅकर्स युजर्सचे संपुर्ण अकाउंट कंट्रोल करू शकतात.

तुमचं ट्वीटर अकाऊंट अपडेट करा, नाहीतर...
SHARES

गुगल आणि फेसबुकनंतर आता ट्विटरचा देखील डेटा लीक होण्याचा धोका निर्माण झाला आहे. काही दिवसांपुर्वीच कंपनीनं हॅकर्सकडून ट्विटर प्लॅटफॉर्मवर व्हायरस कोड टाकल्याची माहिती देण्यात आली होती. हॅकर्स मॅलिशस कोडद्वारे युजर्सचा डेटा देखील चोरी करू शकतात, अशी शंका ट्वीटरकडून व्यक्त करण्यात आली आहे.

हॅकर्स तुमच्या अकाऊंटमधून ट्विट आणि मेसेज देखील करू शकतात. हॅकर्स युजर्सचे संपुर्ण अकाउंट कंट्रोल करू शकतात. ट्विटरनं यावर म्हटलं आहे की, अ‍ॅपमध्ये व्हायरससोबतच डेटा देखील एक्सेस केला जाऊ शकतो. अद्याप डेटा लीक आणि चोरीची कोणतीही माहिती समोर आलेली नाही. कंपनीनं सिक्यूरिटी पॅच जारी केला असून, युजर्सला अ‍ॅप अपडेट करण्याची गरज आहे.

या व्हायरस कोडचा परिणाम आयओएस आणि वेब युजर्सवर पडणार नाही. मात्र अँड्राईड युजर्सच्या डेटाला यामुळे धोका आहे. म्हणून कंपनीनं अ‍ॅप अपडेट करण्यास सांगितलं आहे.



हेही वाचा

लोकेशन मोड बंद असलं तरी फेसबुकला कळतं लोकेशन

आता इन्स्टावर शेअर करा एकावेळी सहा फोटो

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा