कॅब चुकिच्या मार्गानं घेऊन जात असेल तर Google देणार वॉर्निंग

जर तुम्हाला एखाद्या ठिकाणाहून दुसऱ्याठ ठिकाणी जायचं असेल तर हल्ली कॅब(Cab)चा जास्त वापर केला जातो. कारण ते सोईस्कर तर असतेच शिवाय परवडेल अशा दरात कॅब मिळते. मात्र अनेकदा कॅब चालक वेगळ्या मार्गानं किंवा हा शॉर्टकट आहे असं म्हणत घेऊन जातात. कधी तर काही कॅब चालक हा रस्ता सोईस्कर आहे आमि ट्राफिक नाही असं सांगून फिरवून आणतात. त्यामुळे जास्त पैसे देखील मोजावे लागल्याचं एक-दोन घटनांवरून समोर आलं आहे. त्यामुळे गुगल (Google)नं हे फिचर आणलं आहे. 

पर्यटकांसाठी फायदेशीर

या गोष्टीवर चाप बसवण्यासाठी गुगल मॅपनं एक फिचर रोलआउट केलं आहे. त्यानुसार जर कॅब चालकानं तुम्हाला चुकीच्या मार्गानं नेल्यास गुगल मॅप तुम्हाला त्याबाबत सुचना देणार आहे. हे फिचर पर्यटकांसाठी फार उपयोगी ठरणार असल्याचा दावा करण्यात आला आहे.

अॅपचा वापर कसा कराल

१) हे फिचर वापरण्यासाठी प्रथम गुगल मॅप डाऊनलोड करा

२) त्यानंतर ज्या ठिकाणी जायचं आहे त्या जागेचं नाव लिहा

३) तुम्हाला ड्रायव्हिंग आयकॉन दाखवला जाईल तिथं क्लिक केल्यावर Stay Safer चं ऑप्शन येईल 

४) गुगल मॅपच्या नव्या फिचरअंतर्गत तुम्हाला Get Off Route Alerts ऑप्शन मिळेल 

EV चार्जर्स शोधता येणार

यापूर्वी सुद्धा गुगल मॅपनं एक नवं फिचर लाँच केलं होतं. त्यानुसार इलेक्ट्रिक कार सुरू झाल्यानंतर चालकांना EV चार्जर्स शोधता येणार होते. याबाबतची माहिती एका रिपोर्टमध्ये देण्यात आली होती. त्यामध्ये असे ही सांगण्यात आलं होतं की, हे नवे फिचर अॅन्ड्रॉइड स्मार्टफोनसाठी अपडेट करण्यात आले आहे. त्यानुसार कार सपोर्टनुसार स्टेशन्सला फिल्टर करता येणार होते.

ट्रेनमधील गर्दीचा अंदाज घ्या

गुगल मॅपच्या अजून एका नव्या फीचरमुळे आता तुम्ही अॅप वरून प्रवासाचा रूट आणि वाहनासोबतच ट्रेनच्या वेळा आणि गर्दीचा सुद्धा अंदाज घेऊ शकणार आहात. त्यामुळं ट्रेन आणि बसमधून दररोज प्रवास करणाऱ्यांचा काही प्रमाणात त्रास कमी होणार आहे. प्रवाशांना बसण्यासाठी जागा उपलब्ध आहे, काहीच जागा रिकामी आहेत, उभं राहण्याची जागा आहे, जागा नाहीये अशा चार पर्यायात उत्तर मिळेल. यांचा अंदाज घेऊन मग प्रवासी आपली यात्रा प्लॅन करू शकता.


हेही वाचा

गुगल मॅप्सचे नवे फिचर, मॅप्सवर दिसणार हॉटेल, मेट्रोतील गर्दी

सांभाळून करा सोशल मीडियावर पोस्ट, सरकारची तुमच्या फेसबुक, ट्विटरवर नजर

पुढील बातमी
इतर बातम्या