Coronavirus cases in Maharashtra: 230Mumbai: 92Pune: 30Islampur Sangli: 25Nagpur: 16Pimpri Chinchwad: 12Kalyan: 6Ahmednagar: 5Thane: 5Navi Mumbai: 4Yavatmal: 4Vasai-Virar: 4Satara: 2Panvel: 2Kolhapur: 2Ulhasnagar: 1Aurangabad: 1Ratnagiri: 1Sindudurga: 1Pune Gramin: 1Godiya: 1Jalgoan: 1Palghar: 1Buldhana: 1Nashik: 1Gujrat Citizen in Maharashtra: 1Total Deaths: 10Total Discharged: 39BMC Helpline Number:1916State Helpline Number:022-22694725

गुगल मॅप्सचे नवे फिचर, मॅप्सवर दिसणार हॉटेल, मेट्रोतील गर्दी

गुगल मॅप्सनं आपल्या युजर्ससाठी खास फीचर आणलं आहे. हे फिचर तु्म्हाला काय माहिती देईल? हे जाणून घ्या...

गुगल मॅप्सचे नवे फिचर, मॅप्सवर दिसणार हॉटेल, मेट्रोतील गर्दी
SHARE

गुगल मॅप्सनं आपल्या युजर्ससाठी खास फीचर आणलं आहे. याशिवाय मॅप आयकॉन देखील बदलण्यात आलं आहे. मॅपमध्ये देखील बदल करण्यात आले आहेत. मॅपमध्ये सोईस्कर असे काही पर्याय देण्यात आले आहेत. गुगलनं नेमके काय बदल गेले आहेत हे जाणून घ्या. 

मॅपमध्ये 'हे' नवे बदल

मॅपचा आयकॉन बदलण्यात आला आहे. मॅपच्या तळाशी आता पाच टॅब दिले गेले आहेत. एक्सप्लोर, प्रवास, सेव्ह, कॉन्ट्रोब्यूट आणि अपडेट हे ५ पर्याय दिले आहेत. याआधी एक्सप्लोर, प्रवास आणि फॉर यू असे तीन पर्याय होते. याशिवाय गुगल युजर्सला त्यांच्या सोईनुसार सार्वजनिक वाहतुकिविषयी अधिक माहिती देणार आहे.

हॉटेल, मेट्रो दाखवणार मॅप्सद्वारे

रस्त्यांनी जाताना येणाऱ्या हॉटेलबद्दल देखील माहिती मिळेल. एवढेच नाहीतर गुगल मॅप्स त्या हॉटेलमध्ये जेवणासाठी शाकाहारी, मांसाहारी, जैन, वेगन अथवा कॉन्टिनेंटल इत्यादीमध्ये काय पर्याय आहे? याची देखील माहिती देईल. फक्त एवढंच नाही तर गुगल मॅप्स तुम्हाला तुम्ही निवडलेल्या हॉटेलमध्ये गर्दी आहे की नाही? तुम्हाला बसण्यास जागा मिळेल का? याची देखील माहिती देईल.


मेट्रो, लोकलवरही नजर

फक्त हॉटेलसंदर्भातच नाही तर मेट्रो, बस आणि लोकल ट्रेनमध्ये सीट मिळेल की नाही? याची माहिती देखील युजर्स गुगल मॅप्सद्वारे घेऊ शकता. गुगल मॅप्सनं मागील वर्षी बस, मेट्रो, लोकल रेल्वमध्ये गर्दी दर्शवणारं फीचर सुरू केले होतं. हे फीचर यशस्वी ठरलं होतं. आता महिलांसाठी कोच आहे की नाही? बस-डब्ब्यात गार्ड आहे की नाही? मार्गावर सीसीटीव्ही कॅमेरे आहे की नाही? याची देखील माहिती मिळेल.

लाईव्ह व्ह्यूचं फिचर

लाईव्ह व्ह्यूचे फीचर देखील युजर्ससाठी उपलब्ध करण्यात आलेलं आहे. ज्या देशांमध्ये स्ट्रीट व्ह्यूचा पर्याय दिला आहे ते युजर्स याचा वापर करू शकता. सध्या भारतात हे फीचर उपलब्ध नाही. पण बाहेरील काही देशांमध्ये हा पर्याय देण्यात आला आहे

गुगलला होणार १५ वर्ष

गुगल मॅप्स सध्या २२० देशांमध्ये उपलब्ध आहे. यामध्ये युजर्ससाठी सेव्हड, कॉन्ट्रिब्यूट, अपडेट्स, रिव्ह्यू, कंटेट असे अनेक फीचर्स आहेत. ८ फेब्रुवारीला गुगल मॅप्सला १५ वर्ष पुर्ण होणार आहेत. या निमित्तानं गुरुवारी गुगल मॅप्सचे वरिष्ठ उपाध्यक्ष जेन फिट्जपॅट्रिक म्हणाले की, जगभरात गुगल मॅप्सद्वारे युजर्स दररोज सरासरी १०० कोटी किमीचा प्रवास करतातहेही वाचा

गुगलचं 'हे' अ‍ॅप टिकटॉकला देणार टक्कर

ट्विटरवरील ट्रोलर गँगला रोखणारं 'हे' खास फिचर


संबंधित विषय
ताज्या बातम्या