स्नॅपचाटला टक्करं देणारं इन्स्टाग्रामचं नवीन अॅप

फेसबुक आणि व्हॉट्सअॅपसोबतच तरूणाई इन्स्टाग्रामचा देखील अधिक वापर करते. इतका वापर की आपल्यापैकी अनेक जण इन्स्टा स्टार असतील. इन्स्टाच्या याच चाहत्यांसाठी एक चांगली बातमी आहे. इन्स्टाग्रामनं आपल्या युझर्ससाठी नवीन अॅप आणलंय.

अॅपचं नाव?

इन्स्टाच्या नवीन अॅपचं नाव आहे ‘थ्रीड’. इन्स्टाग्रामच्या युझर्सना मेसेजिंग सोप्पं जावं म्हणून हे अॅप तयार करण्यात आलंय. थ्रीड बघून तुम्हाला स्नॅपचॅटची आठवण येईल. असं बोललं जातंय की, स्नॅपचॅटला टक्कर देण्यासाठीच थ्रीड अॅप बनवण्यात आलंय. थ्रीडची घोषणा झाल्यापासून स्नॅपचॅटचे शेअर्स देखील पडलेत.

अॅपची खासियत

इन्स्टाग्रामवर आधीपासून मेसेजिंगची सुविधा आहे. तिथं कुणीही तुम्हाला मेसेज करू शकतो. थ्रीडवर मात्र तुमच्या जवळच्या मित्रांनाच प्रवेश मिळेल. तुम्ही आपल्या जवळच्या मित्रांशी आपलं करंट लोकेशन आणि बॅटरी स्टेटस शेअर करू शकता. तसंच स्टेटस अपलोड करू शकता. फक्त जवळचे मित्रच त्यात असल्यानं तुम्हाला तुमच्या खाजगी गोष्टी शेअर करता येतील. थ्रीड मध्ये ऑटो स्टेटस फिचर आहे. या फिचरमुळे अॅप स्वतःहून तुमचं लोकेशन आणि बॅटरी स्टेटस मित्रांशी शेअर करेल.


हेही वाचा

फेसबुकवरील लाईक्स आणि कमेंट्सचा गेम ओव्हर

गुगलनं चक्क २०० बकऱ्यांना ठेवलं नोकरीवर, वाचा यामागचं रहस्य

पुढील बातमी
इतर बातम्या