Advertisement

फेसबुकवरील लाईक्स आणि कमेंट्सचा गेम ओव्हर

फेसबुकवर आता पोस्टच्या खाली दाखवणाऱ्या लाईक्सची संख्या किती हे कळणार नाही. फेसबुकनं हा निर्णय घेण्यामागे 'हे' आहे कारण.

फेसबुकवरील लाईक्स आणि कमेंट्सचा गेम ओव्हर
SHARES
    • फेसबुक प्रायोगिक तत्वावर लाईक्स आणि कमेंट्ची संख्या हाईड करणार.
    • ऑस्ट्रेलियात गेल्या शुक्रवारपासून याची अंमलबजावणी सुरू.
    • इन्स्टाग्रामवर यापूर्वीच लाइक्स हाईड करण्यासाठी प्रोटोटाइप डिझाईन करण्यात आलंय. पण ते सर्व युजर्ससाठी उपलब्ध नाही.
    • एका महत्त्वाच्या कारणासाठी फेसबुकनं घेतला मोठा निर्णय
     

सोशल मीडियावरील जगप्रसिद्ध असणाऱ्या फेसबुकच्या युजर्सची संख्या लाखोंच्या घरात आहे. त्यात फेसबुकचा जास्त वापर करणाऱ्यांमध्ये तरूणांची संख्या अधिक आहे. एखादा झक्कास फोटो किंवा व्हिडिओ फेसबुकवर टाकला की जास्त लाईक्स आणि कमेंट्स मिळावेत याकडं तरुणाईचा अधिक भर असतो. मग त्यासाठी वाटेल ते करायला देखील नेटकरी तयार होतातपण आता पोस्टच्या खाली दाखवणाऱ्या लाईक्सची संख्या किती हे कळणार नाही.

फेसबुकचा मोठा निर्णय

फेसबुकनं अधिकृतरित्या युजर्सच्या पोस्टखाली दाखवल्या जाणाऱ्या लाईक्सची संख्या हाइड करण्यास सुरुवात केली आहे. २७ सप्टेंबरपूर्वी ऑस्ट्रेलिया इथं पहिल्यांदा हा नवीन नियम लागू करण्यात आला. त्यामुळे पोस्ट करणाऱ्या युजर्सला लाईक्स किंवा रिअॅक्शन किती आहेत हे दिसणार आहे. मात्र अन्य जणांना ती गोष्ट दिसणार नसून फक्त म्युच्युल फ्रेन्ड्स यांच्या नावासह रिअॅक्शन आयकॉन्स दाखवण्यात येणार आहे. अशाच प्रकारे अन्य युजर्स एकमेकांच्या पोस्ट आल्यावर मिळणारे लाइक्स काउंट पाहू शकणार नाहीत. 


व्हिडिओ व्यूजही हाईड

अन्य युजर्सच्या पोस्टला देण्यात येणाऱ्या कमेंट्सची संख्या किंवा पोस्टवर व्हिडिओ व्यूजसुद्धा युजर्स पाहू शकणार नाहीत. मात्र नव्या सिस्टममुळे लाईक्स आयकॉन्सवर टॅप करुन पाहू शकता येणार आहे. यामुळे कोणी तुमच्या पोस्टला लाइक केलं आहे हे समजू शकणार आहे. परंतु टाईमलाइन स्क्रोल करताना लाईक्सची संख्या दिसून येणार नाही.


 हा निर्णय का घेतला?

फेसबुकनं याबाबत असं सांगितलं की, "फेसबुकवर लाईक्स आणि कमेंट्समुळे होणाऱ्या भांडणामुळे कोणता नवा वाद होऊ नये. तसंच हा एक प्रयोग असून यामुळे नवा फॉर्मेट कशा पद्धतीनं वापरतात हे पाहणार आहोत. सोशल मीडियवर युजर्सला मिळणाऱ्याे लाईक्सच्या तणावामुळे सायबर हल्ले किंवा आत्महत्येचे प्रकारही समोर आले. युजर्सच्या मनावर होणारा परिणाम आणि ताण लक्षात घेता लाईक्स, व्यूजची संख्या हाइड करण्याचा निर्णय आम्ही घेतला.”



हेही वाचा

गुगलनं चक्क २०० बकऱ्यांना ठेवलं नोकरीवर, वाचा यामागचं रहस्य

वन प्लस ७ टी मोबाईल आणि टीव्ही लाँच


संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा