Advertisement

गुगलनं चक्क २०० बकऱ्यांना ठेवलं नोकरीवर, वाचा यामागचं रहस्य

कुणाला माहित नसतं ते गुगलला माहित असतं, असं म्हणतात. पण सर्वांची माहिती ठेवणाऱ्या या गुगलबद्दल खूप क्वचितच कुणाला माहित असेल. आज आम्ही तुम्हाला गुगलबद्दलच्या अशाच ९ रंजक गोष्टी सांगणार आहोत.

गुगलनं चक्क २०० बकऱ्यांना ठेवलं नोकरीवर, वाचा यामागचं रहस्य
SHARES

गुगल शिवाय आपलं पान देखील हलत नाही. काही शोधायचं असेल की आपण लगेच गुगलचा आधार घेतो. कुणाला माहीत नसतं ते गुगलला माहीत असतं, असं म्हणतात. पण सर्वांची माहिती ठेवणाऱ्या या गुगलबद्दल खूप क्वचितच कुणाला माहीत असेल. गुगलच्या वाढदिवसानिमित्त आज आम्ही तुम्हाला गुगलबद्दलच्या अशाच ९ रंजक गोष्टी सांगणार आहोत.


) टायपिंगच्या एका चुकीमुळे गुगल हे नाव उदयास आलं. इंग्लिशमध्ये गुगल नावाचा शब्दच नाही. गणितात वापरण्यात येणारा गोगुल हा मूळ शब्द आहे. पण नाव देताना टायपिंग मिस्टेकमुळे गोगुलऐवजी गुगल झालं. पुढं कंपनीनं गुगल हेच नाव ठेवलं.

) गुगल इंटरनेटवरील सर्वात मोठं सर्च इंजिन आहे. गुगलवर दर सेकंदाला ६० हजारहून अधिक सर्च होतात.

) गुगल जगातील सर्वात मोठी कंपनी आहे. अर्थात त्याची कमाई देखील अधिक आहे यात काही शंका नाही. गुगल कंपनी वर्षाला ५००० कोटींची कमाई करते. जाहिरातींच्या माध्यमातून गुगल सर्वाधिक कमाई करते.

) गुगलनं चक्क बकऱ्या नोकरीला ठेवल्या आहेत. विचित्र असलं तरी हे खरं आहे. गुगल ऑफिसच्या समोरील गवत कापण्यासाठी मशीनचा वापर केला जात नाही. तर या कामासाठी चक्क २०० बकऱ्या भाड्यानं घेतल्या आहेत. मशीन वापरून गवत कापल्यानं प्रदूषण होतं. त्यामुळे २०० बकऱ्या गवत खायला ठेवल्या आहेत.

) गुगलनं गेल्या १० वर्षात तब्बल १५६ कंपन्या खरेदी केल्या आहेत. गुगलनं यूट्यूब, अॅण्ड्रॉइड, लिंकडिन, क्रोम, मोटोरोला यांच्यासारख्या अनेक कंपन्या खरेदी केल्या आहेत.

) नासा ही संस्था गुगलच्या हेडक्वार्टरजवळ आहे. त्यामुळे गुगलचे संस्थापक सर्जी ब्रिन आणि लॅरी पेज या दोघांनी तिथलं पार्किंग भाड्यानं घेतलंय.

) गुगलची ४७ देशात ७० ऑफिसेस आहेत. एवढ्या कमी काळात मिळवलेलं हे खूप मोठं यश आहे.

) दर आठवडयाला गुगलमध्ये जवळपास २० हजार लोक नोकरीसाठी अर्ज करतात.

) जर एखाद्या कर्मचाऱ्याचा कामादरम्यान मृत्यू झाला तर कंपनी पुढील दहा वर्ष त्याच्या परिवाराला अर्धा पगार देते.



हेही वाचा

सर्वांची खबर ठेवणाऱ्या गुगलच्या या ट्रिक्स जाणून घ्या

वन प्लस ७ टी मोबाईल आणि टीव्ही लाँच


संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा