सर्वांची खबर ठेवणाऱ्या गुगलच्या या ट्रिक्स जाणून घ्या

गुगलवर शोधलं तर सर्व माहिती मिळते. पण गुगलबद्दलच काही रंजक गोष्टी जाणून घ्यायच्या असतील तर? आता कुठे शोधाल? अरे आम्ही आहोत ना... तुम्हाला आज गुगल संदर्भातीलच काही रंजक गोष्टी सांगणार आहोत.

SHARE

मोबाइल आणि इंटरनेट या दोन गोष्टींशिवाय माणसाला जगणं कठीण आहे, असंच म्हणावं लागेल. कारण आवश्यक असलेली सर्व माहिती गुगलवर मिळतेच. ज्याचं कुणी नाही त्याचं गुगल आहेच हे अनेकदा मस्करीत बोललं जातं. पण ते काही प्रमाणात खरंच आहे. गुगलवर शोधलं तर सर्व माहिती मिळते. पण गुगलबद्दलच काही रंजक गोष्टी जाणून घ्यायच्या असतील तर? आता कुठे शोधाल? अरे आम्ही आहोत ना... तुम्हाला आज गुगल संदर्भातीलच काही रंजक गोष्टी सांगणार आहोत.


१) तुम्हाला काही मनोरंजक खेळ खेळायचे असतील तर तुम्ही गुगलचा अटरी ब्रेकआउट हा गेम खेळू शकता. गुगलच्या होमपेजवर गेल्यानंतर त्याच्या सर्च बॉक्समध्ये तुम्ही अटरी ब्रेकआउट (Atari breakout) हे वाक्य टाईप करून एन्टर केल्यानंतर जी सर्वात पहिली प्रतिमा येईल त्यावर क्लिक केल्यानंतर हा गेम सुरू होतो.

२) गुगलच्या होमपेजवर गेल्यानंतर त्याच्या सर्च बॉक्समध्ये डु अ बॅरल रोल (Do a barrel roll) हे वाक्य टाईप करून इंटर केल्यावर तुमची स्क्रीन वर्तुळाकार गोल फिरेल.

३) आपल्याला जर टॉस करायचा असेल तर आपण गुगलच्या फिल्प क्वाइन (Flip Coin) या ट्रिकचा वापर करू शकतो. त्यासाठी गुगलच्या होमपेजवर गेल्यानंतर त्याठिकाणी दिलेल्या माइकवर क्लिक करून फ्लिप क्वाइन Flip Coin असे बोलावे.

४) गुगलच्या होमपेजवर गेल्यानंतर त्याच्या सर्च बॉक्समध्ये गुगल स्पेअर (Google Sphere) हे टाकून झाल्यानंतर लगेच एन्टर न करता, त्याच्याच खाली दिलेल्या आय एम फिलिंग लकी (I’m feeling lucky) वर क्लिक करा. त्यानंतर तुमची संपूर्ण स्क्रीन गोलाकार आकार बनवेल. हे दिसण्यास खूप अप्रतिम असते.

५) गुगलच्या या वैशिष्ट्यामुळे तुम्हाला एलियनशी गप्पा मारायला भेटतात, म्हणजे तसे भासवले जाते. गुगल अर्थ (Google Earth 5) या वैशिष्ट्याचा वापर करून तुम्ही हे करू शकता. त्यासाठी फक्त सर्च बॉक्समध्ये मेलिझा (Meliza) टाइप करा आणि आतमध्ये जा.

६) टाइमर सेट करण्यासाठी याचा वापर करू शकता. त्यासाठी फक्त सर्च बॉक्समध्ये सेट टायमर फॉर ५ मिनिट्स (Set timer for 5 minutes) टाइप करा.

७) टाईमपास म्हणून गुगलच्या होमपेजवर गेल्यानंतर गुगल ग्रॅव्हटी (Google Gravity) असं टाइप करावं. त्यानंतर आय एम फिलिंग लकी (I’m feeling lucky)वर क्लिक करावं. तुम्हाला तुमच्या स्क्रीनवरील भागांचे तुकडे इकडे- तिकडे उडताना दिसतील.

८) अभिनेत्री किंवा अभिनेत्यांच्या फोटोमधील फक्त त्यांचे चेहरे पाहायचे असल्यास तुम्ही या ट्रिकचा वापर करा. फोटो सर्च मारल्यानंतर फोटो कॉलममध्ये गेल्यानंतर सॉर्टिंगसाठी तुम्हाला खूप पर्याय दिलेले असतात. त्यासाठी डावीकडील टूल्स या पर्यायामध्ये जावे.

९) गुगलच्या सर्च बॉक्समध्ये कॅट नॉईज (Cat noises) टाइप करा आणि एन्टर करा. त्यानंतर तुम्ही वेगवेगळ्या प्राण्यांचे आवाज ऐकू शकता.


हेही वाचा -

महिलांच्या सुरक्षेसाठी स्मार्टफोनचा स्मार्ट वापर

PUBGचा चौथा सिझन लाँच
संबंधित विषय
ताज्या बातम्या