Advertisement

PUBGचा चौथा सिझन लाँच

PUBG या खेळाच्या चाहत्यांसाठी आता एक आनंदाची बातमी आहे. लवकरच या खेळाचा सिझन ४ लाँच होत आहे. याबाबत कंपनीनं ट्विटर अकाऊंटद्वारे माहिती दिली आहे. season 4 of pubg game launching soon

PUBGचा चौथा सिझन लाँच
SHARES

PUBG हा खेळ सध्या तरूणांमध्ये चांगलाच प्रसिद्ध झाला आहे. फक्त तरूण वर्गच नाही तर बच्चे कंपनीला देखील या ऑनलाईन गेमचं वेड लागलं आहे. PUBG या खेळाच्या चाहत्यांसाठी आता एक आनंदाची बातमी आहे. लवकरच या खेळाचा सिझन ४season 4 of pubg game launching soon लाँच होत आहे. याबाबत कंपनीनं ट्विटर अकाऊंटद्वारे माहिती दिली आहे. या गेमचा तिसरा सिझन बॅटल रॉयल गेम (Battle Royale Game) १८ नोव्हेंबर रोजी संपला. त्यानंतर लगेचच चौथा सिझन लाँच होणार आहे.


खेळाडूंसाठी ‘रॉयल पास’

चौथ्या सिझनमध्ये पुन्हा शून्यापासून सुरुवात करायची आहे. पहिल्या सिझनचा म्हणजे सिझन ३ चा स्कोअर आणि रँकींग आपल्या अकाऊंटसोबत जोडले जाणार नाही. नव्या सिझनमध्ये नकाशाच्या गुणवत्तेत सुधारणा करण्यात आली आहे. या नव्या सिझनचे नाव रॉयल पास असेल.


नवीन चॅलेंजेस

युजर्सना प्रत्येक आठवड्यात नवीन चॅलेंज देण्यात येणार आहे. तसंच युजर्सना एलिट अपग्रेड आणि एलिट अपग्रेड प्लस असे दोन पर्याय देण्यात येणार आहेत. दोन्हीमध्ये गेम खेळणाऱ्यांना वेगवेगळे फायदे मिळणार आहेत. या नवीन बदलांबरोबरच युजर्स नव्या सिझनमध्ये असॉल्ट रायफल M762, नवीन हत्यारे, पॅराशूट, विमान आणि वाहनं यांचा वापर करू शकतं. विशेष म्हणजे या गेमच्या कॉम्प्युटर व्हर्जनला मोबाईल व्हर्जनमध्ये बदलता येणार आहे.


'असा' खेळला जातो गेम

आकर्षक व्हिज्युअल्स आणि सतत होत राहणाऱ्या अ‍ॅक्शनमुळे तरुणाई या गेमकडे खेचली गेली. या गेममध्ये वाळवंट, शहर आणि जंगल अशा तीन थीम दाखवण्यात आल्यात. हा गेम एकट्यानं किंवा दोघांची अथवा चौघांची टीम बनवून खेळला जातो. एका बॅटलफिल्टमध्ये 100 अनोळखी गेमर्स एका वेळेस हा गेम खेळतात. गेम खेळताना दिलेली जागा हळूहळू कमी होत जाते. छोट्या जागेत 100 गेमर्स खेळणं अशक्य असतं. त्यामुळे एकमेकांना ठार करून शेवटी जिवंत राहणारा या गेममध्ये जिंकतो. या गेममध्ये हॉकी स्टिक्स, एके ४७, मशीनगन्स, तलवारीच्या साहाय्याने समोरच्या गेमरला ठार मारले जाते.


हेही वाचा

मोबाईलशी आधार लिंक करा घरबसल्या

वाईट सवयी सोडल्या नाहीत, तर हे वॉच देईल शॉक!
संबंधित विषय
Advertisement