Advertisement
COVID-19 CASES IN MAHARASHTRA
Total:
59,17,121
Recovered:
56,54,003
Deaths:
1,12,696
LATEST COVID-19 INFORMATION  →

Active Cases
Cases in last 1 day
Mumbai
15,390
575
Maharashtra
1,47,354
9,350

मोबाईलशी आधार लिंक करा घरबसल्या


मोबाईलशी आधार लिंक करा घरबसल्या
SHARES

मोबाईल नंबर आधारशी लिंक करण्यासाठी धावपळ करत असाल तर त्याची आता गरज पडणार नाही. कारण आता घरबसल्या मोबाईल नंबर आधारशी लिंक करू शकता. टेलिकॉम डिपार्टमेंट (डॉट) नं फॉरेन नॅशनल, अनिवासी भारतीय (एनआरआय), ज्येष्ठ नागरिकांसाठी नवीन सेवा सुरू केली आहे. आता सर्व मोबाईल युजर्सना घरबसल्या आपल्या फोनवरून आधार वेरिफिकेशन करता येणार आहे. भारत सरकारने सर्व मोबाईल धारकांना आपला आधारकार्ड मोबाईल नंबरशी लिंक करण्याची सक्ती केली आहे. मोबाईल नंबर आधारकार्डशी लिंक करण्यासाठी 6 फेब्रुवारी 2018 पर्यंतची मुदत देण्यात आली आहे.


मोबाईलशी आधार लिंक कसे कराल?

तुमच्या मोबाइल नंबरने 14546 या क्रमांकावर कॉल करा

आयव्हीआर सिस्टमवर यूजर्सनी अापला आधारकार्ड नंबर टाकावा

मोबाइल नंबर आणि आधार कार्ड क्रमांक जुळल्यास यूजर्सला वन टाइम पासवर्ड दिले जाईल

आयव्हीआर सिस्टमवर पासवर्ड टाकल्यानंतर तुमचा मोबाइल नंबर वेरिफाय होईल

या सेवेचा लाभ घेण्यासाठी तुमचा मोबाइल नंबर आधार कार्डमध्ये अपडेट होणे गरजेचे आहे, नाहीतर तुम्हाला ओटीपी मिळणार नाही

Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा