Advertisement

महिलांच्या सुरक्षेसाठी स्मार्टफोनचा स्मार्ट वापर

महिलांनी स्वत:च्या सुरक्षेसाठी आता पाऊल उचलणं गरजेचं आहे. सुरक्षतेसाठी महिलांच्या मोबाइलमध्ये यापैकी एक तरी अॅप हवेच.

महिलांच्या सुरक्षेसाठी स्मार्टफोनचा स्मार्ट वापर
SHARES

दिवसेंदिवस स्त्रियांच्या सुरक्षेचा प्रश्न गंभीर होत चालला आहे. वर्तमानपत्रात रोज येणाऱ्या स्त्रियांवरील अत्याचाराच्या बातम्या मन अस्वस्थ करून सोडतात. हे सगळं कधी आणि कसं थांबेल हे कुणालाच माहीत नाही. पण या सर्व गोष्टी थांबतील तेव्हा थांबतील. पण स्वत:च्या सुरक्षेेची आणि रक्षणाची जबाबदारी ही स्वत: स्त्रियांनीच घेतली पाहिजे. आज आम्ही तुम्हाला अशाच काही शस्त्रांविषयी माहिती देणार आहोत ज्यांच्या मदतीनं तुम्ही स्वत:चं रक्षण स्वत: करू शकता.


स्मार्टफोनचा वापर 

पहिलं शस्त्र म्हणून तुम्ही स्मार्टफोनचा वापर करू शकता. तुम्हाला प्रश्न पडला असेल की, स्वत:च्या सुरक्षतेसाठी स्मार्टफोनचा वापर कसा होऊ शकतो. तर स्मार्टफोनच्या मदतीनं तुम्ही असे काही अॅप्स वापरू शकता ज्यांचा वापर महिलांच्या सुरक्षेसाठी करता येऊ शकतो. आम्ही सुचवलेली अॅप्स तुमच्या मोबाइलमध्ये असतील तर महिला स्वत:चा बचाव करू शकतात.


१) लाईफ ३६० अॅप 

लाईफ ३६० अॅप ( Life 360 App) जीपीएस ट्रॅकिंग या तंत्रज्ञानावर चालते. या अॅपच्या मदतीनं तुम्ही करंट लोकेशनची माहिती पाठवू शकता. या अॅपद्वारा जीपीएस, वाय-फायच्या माध्यमातून कोणता व्यक्ती कोणत्या ठिकाणी आहे याची माहिती मिळवता येते.

याशिवाय या अॅपमध्ये एक पॅनिक बटन आहे. हे अॅप दाबल्यावर जवळच्या व्यक्तीला मदतीसाठी SOS मेसेज पाठवला जातो. आयओएस आणि अँड्राॅईड अशा दोन्ही प्लॅटफॉर्मवर हा अॅप उपलब्ध आहे.


२) निर्भया : बी फिअरलेस  

निर्भया : बी फिअरलेस (Nirbhaya : be fearless) हे अॅप दिल्लीमधल्या दुर्दैवी निर्भया प्रकरणानंतर तयार करण्यात आलं आहे. यामध्ये जीओ फॅन्स, स्टॉप, शेक टू अलर्ट, अनसेफ एरिया अलर्ट आणि हीट मॅप सारखे जबरदस्त फीचर्स आहेत. हे अॅप प्रत्येक ३०० मीटरनंतर लोकेशन अपडेट करते.


संकटाच्या वेळी जर या अॅपमधला SOS पर्याय तुम्ही निवडला तर दर २ मिनिटांनी हे अॅप तुम्ही ज्या व्यक्तींचे नंबर सेव्ह केले आहेत त्यांना मेसेज पाठवत राहील. आयओएस आणि अँड्राॅईड अशा दोन्ही प्लॅटफॉर्मवर हे अॅप उपलब्ध आहे.


३) आय फिल सेफ

सर्वात महत्त्वाचं तुमच्या स्मार्टफोनची स्क्रीन लॉक असेल किंवा सीम कार्डला नेटवर्क नसेल किंवा वाय-फाय अव्हेलेबल नसेल तेव्हा देखील आय फिल सेफ  (I Feel Safe) हे अॅप काम करते. या अॅपमध्ये व्हर्चुअल पॅनिक बटनची खास सोय देण्यात आली आहे. अॅपमधील सेफ्टी पाॅवर बटन पाच वेळा दाबल्यावर अलार्म अॅक्टीव्ह केला जाऊ शकतो.


या अॅपमधील बहुतांश फीचर्ससाठी इंटरनेटची देखील गरज नाही. संकटाच्या वेळी फोनबुकमधील कॉन्टॅक्सना हे अॅप मेसेज आणि लोकेशन पाठवते. आयओएस आणि अँड्राॅईड अशा दोन्ही प्लॅटफॉर्मवर हे अॅप उपलब्ध आहे.


४) आयसीई : पर्सनल सेफ्टी अॅप

तुम्ही स्मार्टफोन एकदा झटकला किंवा स्मार्टफोनला कनेक्ट असलेला एयरफोन ओढून काढला तर आयसीई : पर्सनल सेफ्टी अॅप (ICE : Personal Sefty App) तुमच्या कॉन्टॅक्सना लगेच अलर्ट पाठवते. जीपीएस लोकेशन सोबत इमेल आणि टेक्स्ट मेसेज देखील तुमच्या कॉन्टॅक्सना पाठवला जातो. जोवर तुम्ही हे बंद करत नाही तोवर हे अॅप कॉन्टॅक्सना अपडेट देणं सुरूच ठेवतं.


हे अॅप तुम्हाला आसपासची पोलिस स्टेशन्स आणि हॉस्पिटलची देखील माहिती देते. या व्यतिरिक्त हे अॅप महिलांना सेल्फ डिफेन्सच्या टिप्स देखील पाठवत असते. आयओएस आणि अँड्राॅईड अशा दोन्ही प्लॅटफॉर्मवर हे अॅप उपलब्ध आहे.


५) चील्ला : अँटी रेप वुमन अॅप

चील्ला : अँटी रेप वुमन अॅप (Chilla : Anti Rape Women App) या अॅपची खासियत म्हणजे, हे अॅप ओरडण्याचा किंवा किंचाळण्याचा आवाज ऐकल्यावर ऑटोमॅटिक अॅक्टीव्ह होते. इतर अॅप्स प्रमाणे हे अॅप देखील संकटकाळी तुमच्या कॉन्टॅक्सना तुमचे लोकेशन पाठवते.


स्मार्टफोनचे पावर बटन ५ वेळा दाबल्यावर देखील हे अॅप अॅक्टीव्ह करता येते. मुख्य म्हणजे फोन स्वीच ऑफ असेल किंवा बॅटरी संपली असेल तरी हे अॅप काम करते. आयओएस आणि अँड्राॅईड अशा दोन्ही प्लॅटफॉर्मवर हे अॅप उपलब्ध आहे.

आम्ही सांगितलेल्या पाच अॅप्सपैकी एक तरी अॅप तुमच्या मोबाईलमध्ये असणं आवश्यक आहे. संकटादरम्यान या अॅप्सचा तुम्हाला नक्कीच फायदा होईल.हेही वाचा -

'या' ७ कारणांमुळे मोबाईलची बॅटरी लवकर संपते

असा हाताळा DSLR कॅमेरा
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा