Advertisement

'या' ७ कारणांमुळे मोबाईलची बॅटरी लवकर संपते

मोबाईल

'या' ७ कारणांमुळे मोबाईलची बॅटरी लवकर संपते
SHARES

स्मार्टफोनमध्ये सातत्यानं नवनव्या फिचर्सची भर पडत असते. पण बॅटरी डाऊन होणं ही सगळ्याच स्मार्टफोन युझर्सची तक्रार असते. बॅटरी कितीही MAHची का असेना; पण जास्त वापरल्यानंतर पूर्ण दिवस बॅटरी टिकणं फार कठीण काम असतं. पण आम्ही तुम्हाला काही टिप्स सांगणार आहोत ज्याचा वापर करून तुम्ही तुमच्या मोबाईलची बॅटरी वाचवू शकता.

१) स्क्रीनवर ऑटो ब्राईटनेस वापरा. स्मार्टफोनच्या स्क्रिनमुळे सर्वात जास्त बॅटरी जाते. ऑटो ब्राइटनेस मोड ऑन केल्यानं आजूबाजूच्या प्रकाशाच्या हिशेबानं स्क्रीनचा ब्राईटनेस अॅडजेस्ट होतो.

२) वेब ब्राऊजिंग करताना तुम्हाला अनेक अॅड येत असतात. या अॅडमुळे बॅटरी अधिक वापरली जाते. यासाठी अॅड ब्लॉकर मोबाईलमध्ये इन्स्टॉल करू शकता. ज्यामुळे तुमची बॅटरी दिर्घकाळ राहील.



३) इ-मेलचा देखील बॅटरीवर परिणाम होतो. एकाच वेळी अनेक इ-मेल वापरल्यानं किंवा तुम्हाला जास्त इ-मेल येत असतील तर जास्त डेटा वापरला जातो. पुश नोटिफिकेश जर तुमच्या मोबाईलमध्ये असेल तर बॅटरीचा जास्त वापर होतो. मेल असो वा काही इतर मेसेज असो प्रत्येक वेळी पुश येतं. त्यामुळे सेटिंगमध्ये जाऊन पुश नोटिफिकेशन बंद करा.

४) हल्ली गाणी ऐकण्यासाठी ऑनलाईन स्ट्रिमिंग अॅप वापरले जाते. यामुळे बॅटरीचा वापरही अधिक होतो. ऑनलाईन स्ट्रिमिंगच्या मदतीनं गाणी ऐकल्यास दोन तासात १० टक्क्यापर्यंत बॅटरी लागते. तर मोबाईलवर डाऊनलोड केलेली गाणी ऐकल्यानं दोन तासात ५ टक्के बॅटरी खर्च होते.



५) वाय-फाय किंवा मोबाईल नेटवर्क कमकूवत असेल तरीही बॅटरी अधिक जाते. कारण नेटवर्क मिळवण्यासाठी जास्त बॅटरी लागते. वाय-फाय डेटा बंद करून मोबाईल डेटा वापरा.

६) आयफोन आणि अँड्रॉईड सिस्टममध्ये कोणते अॅप किती बॅटरी खाते हे चेक करा. सेटिंगमध्ये बॅटरी मेन्यूमध्ये जाऊन तुम्ही चेक करू शकता. वापरात नसलेल्या अॅपमुळे जास्त बॅटरी खर्च होत असेल तर ते अॅप अनइन्स्टॉल करा.

७) फोनचं लोकेशन ट्रॅकिंग ऑफ ठेवा. जीपीएसमुळे लोकेशन शोधणं सोप्प जातं हे खरं आहे. पण त्यामुळे आपली बॅटरी पण जाते. अनेकदा जीपीएस आपण ऑफ करणं विसरतो. त्यामुळे बॅटरी अधिक जाते. यासाठी गरज नसल्यास जीपीएस बंद ठेवा.



हेही वाचा

या ट्रिक्स वापरून करा तुमच्या कॅमेऱ्याची लेन्स क्लिन

हे आहेत व्हॉट्सअॅपचे ५ नवीन फिचर्स


संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा