Advertisement

मोबाईल पाण्यात पडला? नॉट टू वरी! हे करा...


मोबाईल पाण्यात पडला? नॉट टू वरी! हे करा...
SHARES

मोबाईल पाण्यात पडल्यानंतर जीव अक्षरश: अर्धा होतो. एवढा महाग मोबाईल पाण्यात पडल्यावर कसं वाटतं याचा अनुभव मला काय अनेकांना असेल. आता तर पावसाळा जवळ येत आहे. मग अशा परिस्थितीत पावसात कधी तरी मोबाईल ओला होतो किंवा काही जणांचा मोबाईल चुकून पाण्यात पडतो सुद्धा!



मोबाईल पाण्यात पडण्याची प्रत्येकाची वेगळी कारणं असू शकतात. पण अशा परिस्थितीत बहुतांश वेळी आपण घाबरतो. पाण्यात पडलेल्या मोबाईलला आपण पुन्हा चालू करण्याचा प्रयत्न करतो. पण सुरुवातीला चालू झालेला मोबाईल नंतर किती वेळ चालेल याची काही गॅरंटी नसते. पाण्यात पडलेला मोबाईल उचलल्यानंतर तो चालू करताच अनेक वेळा मोबाईलचा डिस्प्ले उडतो. त्यामुळे अशा परिस्थितीत नेमकं काय करायला हवं, याच्या काही टिप्स....

) पाण्यातून मोबाईल काढताच सर्वप्रथम स्विच ऑफ करा आणि त्याची बॅटरी, सिम कार्ड, मेमरी कार्ड काढून ठेवा. या गोष्टी काढून ठेवल्यामुळे शॉर्ट सर्किटचा धोका कमी होतो.



) मोबाईलमधून पाणी काढणं आवश्यक आहे. त्यासाठी भिजलेला फोन तांदूळ असलेल्या भांड्यात ठेवा. दोन दिवस तरी तुमचा मोबाईल तांदळात ठेवणं आवश्यक आहे.



) मोबाईल फोन व्हॅक्यूम क्लिनरनं २०-२५ मिनिटं कोरडा करावा. यामुळे इंटरनल पार्ट्समधील पाणी पूर्णपणे सुकून जातंमात्र, लगेचच फोन ऑन करू नकायामुळे मोबाईल खराब होईल. एक दिवसानंतर फोन ऑन करा.



) अनेक जण मोबाईलमधलं पाणी वाळवण्यासाठी हेअर ड्रायरचा वापर करतात. पण या ट्रिकमुळे तुमचा मोबाईल खराब होऊ शकतो. कारण ड्रायरमधली हवा गरम असते. त्यामुळे मोबाईलमधलं सर्किट वितळू शकतं. शिवाय ड्रायरमुळे पाणी तुमच्या मोबाईलच्या इंटर्नल पार्ट्सपर्यंत पोहोचतं.



) सिलिका जेलचा देखील तुम्ही वापर करू शकता. यासाठी सिलिका जेलचं पॅकेट्स तुम्ही एका बंद डब्यात ठेवा. २४ तसांसाठी मोबाईल सिलिका जेलच्या डब्यात ठेवल्यानं पाणी वाळण्यास मदत होईलसिलिका जेल पाणी लवकर शोषून घेते.



) मोबाईलवरचं पाणी पुसण्यासाठी टिश्यू पेपर किंवा एखादा मऊ कपडा वापरावा.



) मेमरी कार्ड, सिम कार्ड आणि बॅटरी वेगळी करावी आणि सूर्यप्रकाशात किंवा उष्ण ठिकाणी ठेवावे. यामुळे मोबाईलमधील पाणी वाळण्यास मदत होईल.




हेही वाचा

सावधान! तुमच्याही मोबाईलचा होऊ शकतो स्फोट!


संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा