Advertisement

हे आहेत व्हॉट्सअॅपचे ५ नवीन फिचर्स


हे आहेत व्हॉट्सअॅपचे ५ नवीन फिचर्स
SHARES

लहान असो वा मोठं सगळ्यांनाच व्हॉट्सअॅपची क्रेझ आहे. ही क्रेझ लक्षात घेऊन व्हॉट्सअॅपनं काही नवीन फिचर्स अॅड केली आहेत. सुरूवातीला फक्त मॅसेजिंगसाठी हे अॅप लोकप्रिय होतं. पण आता व्हॉट्सअॅपवरून व्हाइस मेसेज, पाईल सेंडिंग आणि व्हिडिओ कॉलिंग अशा अनेक सुविधा उपलब्ध झाल्या आहेत.

युजर्सची गरज समजून व्हॉट्सअॅप ठराविक अंतराने काही ना काही फिचर्स अॅड करत आहे. येत्या काही दिवसांमध्ये व्हॉट्सअॅप आणखी काही फिचर्स अॅड करणार आहे. नेमके हे फिचर्स काय आहेत आणि त्याचा आपल्याला कसा फायदा होईल याची ही माहिती.


फेसबुक पोस्ट व्हॉट्सअॅपवर  

सध्या फेसबुकवरील पोस्ट व्हॉट्सअॅपवर शेअर करण्यासाठी ती लिंक कॉपी करावी लागते किंवा तिचा यूआरएल कॉपी करावा लागतो. त्यानंतर तो व्हॉट्सअॅपवर शेअर करता येतो. पण आता व्हॉट्सअॅप असं फिचर आणणार आहे. ज्यामुळे तुम्हाला फेसबुकच्या पोस्ट डायरेक्ट व्हॉट्सअॅपवर शेअर करू शकता.


ग्रुप व्हिडिओ कॉलची सुविधा

आत्तापर्यंत सिंगल व्हिडिओ चाट सुविधा उपलब्ध आहे. पण येत्या काही दिवसांमध्ये व्हॉट्सअॅप ग्रुुप व्हिडिओ चाटही सुविधा युजर्सना अनुभवता येणार आहे. यामुळे एकावेळी अनेक मेंबर्स संवाद साधू शकतात. कित्येक महिन्यांपासून यावर काम करण्यात येत होतं. यामध्ये यश मिळालं असून त्याचं प्रात्याक्षिक नुकतंच सादर करण्यात आलं.


क्लिक टू चार्ट

तुमच्या कॉन्टेक्ट लिस्टमध्ये सेव्ह नसणाऱ्या नंबरला देखील तुम्हा आता मेसेज पाठवू शकता. तुम्हाला कुणाला व्हॉट्सअॅप करायचा असेल तर युजर्सना पहिला नंबर सेव्ह करावा लागायचा. त्यानंतरच तुम्ही त्या नंबरवर मेसेज पाठवू शकत होतात. पण आता तुमच्या कॉन्टेक्ट लिस्टमध्ये सेव्ह नसणाऱ्या युजर्सना देखील तुम्ही मेसेज पाठवू शकता.


सिलेक्ट ऑल

या फिचरमुळे युजर्सनां आलेले नवीन मेसेज रीड किंवा अनरीड अशा प्रकारात मार्क करता येणार आहेत. तसंच मेसेज डिलिट करणं पण या फिचरमुळे सोपं जाणार आहे.


न्यू मीडिया व्हिजिबीलिटी

या फिचरमध्ये मोबाइल गॅलरीमधून यपजर्सना व्हॉट्सअॅप मीडिया कन्टेन्ट हाईड करून ठेवता येऊ शकतो. सध्या व्हॉट्सअॅपवर बिटा व्हर्जन २.१८.१५९ या वर हे फिचर उपलब्ध आहेहेही वाचा

ठाण्याच्या अक्षयची 'नासा'वारी!संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा