Advertisement

ठाण्याच्या अक्षयची 'नासा'वारी!


ठाण्याच्या अक्षयची 'नासा'वारी!
SHARES

'नासा'सारख्या प्रसिद्ध संस्थेमध्ये प्रतिनिधित्व करायला मिळणं हे कुणासाठीही नक्कीच अभिमानास्पद आहे. पण हे वाचून तुम्हाला अभिमानास्पद वाटेल की, नासासाठी भारतातून ३ मुलांची निवड झाली आहे. त्यापैकी एक आहे ठाण्यातील १७ वर्षांचा अक्षत मोहिते! अमेरिकेत होणाऱ्या २०१८च्या 'इंटरनॅशनल स्पेस डेव्हलपमेंट कॉन्फरन्स'साठी नासातर्फे अक्षयला आमंत्रण देण्यात आलं आहे. अक्षयनं तयार केलेलं स्पेस सेटलमेंट म्हणजेच अंतराळात राहता येईल अशा यंत्राची नोंद नॅशनल स्पेस सोसायटीनं घेतली आहे. त्यानं स्पेस सेटलमेंटला 'सॅक्झिमो' असं नाव दिलं आहे.



अंतराळात वसणार शहर?

दिवसेंदिवस वाढत जाणारं काँक्रिटचं जंगल आणि प्रदूषणाच्या विळख्यात अडकलेल्या पृथ्वीला आता आरामाची गरज असल्याचं ओळखून अक्षतनं एक यंत्र तयार केलं. आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकाला समोर ठेवून तयार करण्यात आलेल्या या यंत्रात सुमारे २० हजार लोक राहू शकतील. यंत्रामधून पृथ्वीवरील लोकांना अंतराळात पाठवण्यात येईल.



या स्पेसरूपी शहरामध्ये रहिवासी आणि औद्योगिक क्षेत्र असून यासाठी लागणारी वीज ही सौर उर्जा आणि मायक्रोवेव्हद्वारे निर्माण केली जाणार आहे. इंधनासाठी दोन इलेक्ट्रॉनच्या संयोगातून इंधन निर्मिती केली जाणार आहे. हे स्पेसक्राफ्ट अंतराळात नेण्यासाठीही हायड्रोजन आणि ऑक्सिजनच्या संयुगावरील हायड्रोजिन या इंधनाचा वापर केला जाणार आहेतर इंटरनेटसाठी वायफायऐवजी लाईट इंटरनेट म्हणजेच 'लायफाय' हे तंत्र स्पेसमध्ये वापरले जाईलअसा त्याचा प्रोजेक्ट आहे.



रोजच्या जगण्यासाठी या स्पेसरुपी शहरात आवश्यक वातावरण तयार करण्यात येईल. मनोरंजनासाठी अर्ध-गुरुत्वाकर्षण असणारे फुटबॉल स्टेडिअम तयार करणे, तसेच शेती अशा अनेक सुविधांचा या संशोधनामध्ये समावेश करण्यात आला आहे.


नासाचे शास्त्रज्ञ प्रणित पाटील यांच्या एका सेमिनारला गेलो होतो. या सेमिनारमधूनच मी प्रेरित झालो. जवळपास १० दिवस मला हा प्रोजेक्ट बनवायला लागले. माझा हा प्रोजेक्ट नासासाठी निवडला गेल्याचा मला नक्कीच आनंद झाला आहे. नववीत असल्यापासून मला विज्ञान विषयाची आवड होती. त्यामुळेच मला आज ही मोठी संधी मिळाली आहे.

अक्षत मोहिते


पहिली नासावारी मुकली

अक्षयच्या या प्रोजेक्टची नासाकडून दखल घेण्यात आली. यासाठी अक्षयला या महिन्याच्या २४ ते २७ तारखेदरम्यान अमेरिकेच्या इंटरनॅशनल स्पेस डेव्हलपमेंट कॉन्फरन्समध्ये सहभागी व्हायचे होते. अक्षयला अमेरिकेला जाण्यासाठी काही आर्थिक अडचणी होत्या. पण शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक यांनी अक्षयचा अमेरिकेला जाण्याचा पूर्ण खर्च उचलला.



पण ऐनवेळी व्हिसा रद्द झाल्यामुळे अक्षयची यावेळेची नासावारी मुकली. पण नासाला अक्षयचा प्रोजेक्ट इतका आवडला आहे की, त्यांनी पुढच्या वर्षी अक्षयला 'इंटरनॅशनल स्पेस डेव्हलपमेंट कॉन्फरन्स'मध्ये सहभागी होण्यासाठी लेटर पाठवलं आहे. त्यामुळे यावर्षी जाता आलं नसलं, तरी पुढच्या वर्षी नक्की या कॉन्फरन्ससाठी सहभागी होईन, असं अक्षयनं स्पष्ट केलं.


त्याच्या या यशासाठी अक्षयला कुटुंबियांसोबतच त्याचे शाळेतील भौतिकशास्त्राचे शिक्षक दिपेश धायफुले आणि नासाचे प्रतिनिधी प्रणित पाटील यांनी सहकार्य केल्याचं त्याने विशेष नमूद केलं. 



हेही वाचा

शिटी वाजवून पठ्ठ्यानं उंचावलं भारताचं नाव!


संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा