क्रेडिट कार्डने भरता येणार घराचं भाडं, पेटीएमकडून सुविधा

पेटीएमकडून ग्राहकांसाठी एक खास ऑफर देण्यात आली आहे. भाडेकरू घराचे भाडे आता क्रेडिट कार्डद्वारेही भरू शकतात. पेटीएमने ही सुविधा उपलब्ध करुन दिली आहे. या सुविधेत पैसे ताबडतोब घरमालकाच्या बँक खात्यात जमा होणार आहेत.

 क्रेडिट कार्डमधून घराचं भाडे भरल्यावर १००० रुपये कॅशबॅक देण्याचं पेटीएमने  जाहीर केलं आहे. याशिवाय भाड्याच्या प्रत्येक व्यवहारावर  क्रेडिट कार्ड पॉईंटदेखील मिळणार आहेत. घर मालकाला घराचे भाडे देण्यासाठी यूजर्सना पेटीएमच्या होम स्क्रीनवर “रिचार्ज अँड पे बिल्स’ सेक्शनमध्ये जाऊन “रेंट पेमेंट’ निवडावे लागेल.

युजर्स आपल्या क्रेडिट कार्डातून थेट आपल्या घर मालकाच्या बँक खात्यात पैसे जमा करू शकतात. यासाठी तुम्हाला घर मालकाच्या बँक खात्याचाही तपशील भरावा लागणार आहे. भाडं देण्याची तारीख जवळ आली की याचीही आठवण तुम्हाला करून देण्यात येईल.पेटीएम यूपीआय, डेबिट कार्ड आणि नेटबँकिंगद्वारे घरभाडं देण्याची सुविधा देखील देत आहे.

दरम्यान, पेटीएमने दुकानात साऊंड बॉक्सची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. सध्या प्रत्येक दुकानदाराने आपल्या दुकानावर ऑनलाईन पेमेंटची सुविधा दिली आहे. पण गर्दीच्या वेळी खात्यामध्ये पैसे आले का हे तपासणं अशक्य होतं. त्यामुळे आता पेटीएम साऊंड बॉक्सची सुविधा देण्यात आली आहे. यामुळे खात्यामध्ये पैसे येताच दुकानदाराला तात्काळ कळेल.

तुम्हालाही जर पेटीएमचा साऊंड बॉक्स लावायचा असेल तर त्यासाठी ऑनलाईन ऑर्डर करावी लागेल. हा बॉक्स थेट तुमच्या पत्त्यावर येईल. या साऊंड बॉक्समध्ये तुम्हाला दरमहा बिल भरावं लागणार आहेत. एकदा पैसे भरल्यानंतर तुम्ही १८ महिन्यांपर्यंत हा बॉक्स वापरू शकता.


हेही वाचा -

रेल्वे प्रवाशांसाठी मोबाइल ट्रेन रेडिओ कम्युनिकेशन यंत्रणा

आधार कार्ड 'या' १५ गोष्टींसाठी सक्तीचं


पुढील बातमी
इतर बातम्या