Big Boss Marathi 3 : खेळाच्या तिसऱ्याच दिवशी शिवलीलाला अश्रु अनावर

बहुचर्चित आणि बहुप्रतिक्षीत ‘बिग बॉस मराठी’ सिझन ३ ची दणक्यात सुरवात झाली आहे. शो ला सुरू होऊन दोनच दिवस झाले असले तरी हा शो प्रेक्षकांना प्रचंड आवडतं आहे. यात स्पर्धक एकीकडे वाद तर दुसरीकडे दंगा मस्ती करताना पाहायला मिळत आहेत.

बुधवारच्या भागात शिवलीला घरामध्ये थोडीशी भाऊक होताना दिसणार आहे. “आईला बघताना कसं वाटत असेल, कसं वागावं कळतं नाहीये”. त्यावर मीनलने तिला समजावलं “तू खूप छान वागत आहेस. चांगलं खेळत आहेस. तुझी विचार स्पष्ट आहेत. तुला कधीही काही वाटलं तर मी आहे तुझ्यासोबत. विशाल निकम देखील म्हणाला “माऊली तुम्ही खूप खंबीर आहात”.

सोलापूर जिल्ह्यातील बार्शी हे शिवलीला पाटील हिचे गाव आहे. सोशल मीडियावर ज्यांची कीर्तनं प्रसिद्ध आहेत, अशा तरुण कीर्तनकारांमध्ये ह.भ.प. शिवलीला बाळासाहेब पाटीलचं नाव घेतलं जातं. शिवलीलाच्या कीर्तनाचे व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात पाहिले जातात. संत साहित्य, संस्कृती आणि सद्य विषयांवर शिवलीला कीर्तन करते.

शिवलीलाचे वडील बाळासाहेब पाटील कीर्तनकार आहेत. घरातूनच तिला कीर्तनाचे बाळकडू मिळाले आहे. वयाच्या पाचव्या वर्षी शिवलिला कीर्तन करू लागली. त्यानंतर तिने अनेक गावांत कीर्तनं केली. तिच्या कीर्तनाला प्रतिसाद मिळू लागला. वयाच्या दहाव्या वर्षापर्यंत शिवलीलानं ग्रामीण आणि शहरी भागात स्वतःचा चाहता वर्ग बनवला.

दरम्यान, चिऊ ताई चिऊ ताई दार उघड हा नवा टास्क घरातील सदस्यांना देण्यात आला. या टास्कमध्ये घरातील पुरुष सदस्य महिला सदस्यांना सायकल रिक्षाची सैर करवणार असं असतं. यासाठी दोन सायकल रिक्षा देण्यात आलेल्या असतात. या टास्क दरम्यान अपघात होतो आणि काही सदस्य पडून त्यांना दुखापत होते.

बिग बॉस मराठीच्या घरामध्ये मंगळवारी चिऊ ताई चिऊ ताई दार उघड हा टास्क सुरू झाला. ज्यामध्ये पुरुष मंडळी महिला सदस्यांना विनवणी करताना दिसून आले. यातून दोन नावं समोर आली विकास आणि उत्कर्ष. या दोघांमध्ये लढत झाली आणि पहिल्या साप्ताहीक कार्याचा विजेता ठरला उत्कर्ष.

मीराचा घरातील सदस्यांबरोबर वेगवेगळ्या गोष्टींना घेऊन वाद झाला. तिचा राग सगळ्याच घरच्यांनी अनुभवला.


हेही वाचा

बिग बॉसच्या घरात अपघात, टास्क दरम्यान ‘या’ सदस्यांना दुखापत

चिऊ ताई चिऊ ताई दार उघड, घरात रंगणार नवा टास्क

पुढील बातमी
इतर बातम्या