Advertisement

चिऊ ताई चिऊ ताई दार उघड, घरात रंगणार नवा टास्क

अवघ्या दुसऱ्या दिवशी बिग बॉसनी स्पर्धकांना एक नवा टास्क दिला आहे.

चिऊ ताई चिऊ ताई दार उघड, घरात रंगणार नवा टास्क
SHARES

बिग बॉस (Big boss marathi) मराठीचा तिसरा पर्व (Season 3) आपल्या भेटीला आला आहे. पहिल्याच दिवसापासून घरात धमाकेदार प्रसंग आणि स्पर्धकांमध्ये उत्साह पाहायला मिळत आहे. नॉमिनेशन टास्कनंतर (New Task) बिग बॉसच्या घरात 'चिऊ ताई चिऊ ताई दार उघड' हा मजेशीर खेळ रंगणार आहे.

नुकताच घरामध्ये पहिला नॉमिनेशन टास्क पार पडला होता. तर मंगळावारी म्हणजेच अवघ्या दुसऱ्या दिवशी बिग बॉसनी स्पर्धकांना एक नवा टास्क दिला आहे. हा टास्क खूपच मजेशीर असणार आहे. या टास्कच नाव ऐकून सर्वानाच आपल्या बालपणीची आठवण होईल.

कारण या टास्कचं नाव आहे 'चिऊ ताई चिऊ ताई दार उघड'. हा टास्क नेमका काय आहे? किंवा नेमकं कोणतं काम यामध्ये करायचं आहे हे आपल्यला आजच्या भागामध्ये पाहायला मिळणार आहे.

नुकताच बिग बॉस मराठीचा नवा प्रोमो आपल्या समोर आला आहे. या प्रोमोनं सर्वांचीच उत्कंठा वाढवली आहे. या प्रोमोमध्ये सर्व पुरुष मंडळी महिलांजवळ जाऊन आपलं म्हणणं पटवून देण्याचा प्रयत्न करत आहेत. तर महिला प्रत्येकाचं म्हणणं ऐकून घेत आहेत.

प्रोमोमध्ये अविष्कार मीराला सांगत आहे, 'आम्ही तुमची सेवा करू इच्छितो' यावर मीरा म्हणत आहे , 'तुम्ही तर माझं ऐकतच नाही' तर घरातील इतर पुरुष स्पर्धक विशाल, जय, विकास, दादूस सर्वजण महिलांना त्यांची सेवा करण्याचं आश्वासन देत आहेत. त्यामुळे हा टास्क प्रत्यक्षात टीव्हीवर पाहताना मोठी मज्जा येणार आहे.

बिग बॉस मराठी' तिसऱ्या पर्वाचा हा तिसरा दिवस आहे. आणि ग्रँड प्रीमियरमध्येच होस्ट महेश मांजरेकर यांनी सांगितलं होतं की हा पहिला आठवडा महिलांच्या नावावर असणारा आहे. त्यामुळे महिलांना विशेष हक्क असणार आहेत. तर पुरुष स्पर्धक हे त्यांचे सेवक असणार आहेत.

महिला स्पर्धकांनी फक्त त्यांच्या सेवकांना मार्गदर्शन करायचं आणि बाकी सर्व काम पुरुष सेवकाने पार पाडायचं असं सांगण्यात आलं आहे. तसेच पहिल्याच दिवसापासून स्पर्धकांमध्ये जबरदस्त वादावादी होताना दिसून येत आहे.हेही वाचा

अटकेचं भय! अखेर कंगना न्यायालयात हजर

आयकर विभागाच्या कारवाईनंतर अखेर सोनू सूदनं सोडलं मौन, म्हणाला...

संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा