Advertisement

बिग बॉसच्या घरात अपघात, टास्क दरम्यान ‘या’ सदस्यांना दुखापत

नव्या टास्कमध्ये अपघात झाल्याचा प्रोमो पाहायला मिळत आहे. यासोबतच काही सदस्यांनाही दुखापत झाली आहे.

बिग बॉसच्या घरात अपघात, टास्क दरम्यान ‘या’ सदस्यांना दुखापत
SHARES

बिग बॉस मराठीच्या घरामध्ये पाहिल्याच दिवशी नॉमिनेशन टास्क पार पडला आणि सदस्यांनी त्यांच्या नजरेत कोण टिकाऊ आणि कोण टाकाऊ आहे हे सांगितलं. त्यानंतर आणखी एक टास्क स्पर्धकांना देण्यात आला. पण  या टास्कमध्ये अपघात झाल्याचा प्रोमो पाहायला मिळत आहे. यासोबतच काही सदस्यांनाही दुखापत झाली आहे.

चिऊ ताई चिऊ ताई दार उघड हा नवा टास्क घरातील सदस्यांना देण्यात आला. या टास्कमध्ये घरातील पुरुष सदस्य महिला सदस्यांना सायकल रिक्षाची सैर करवणार असं असतं. यासाठी दोन सायकल रिक्षा देण्यात आलेल्या असतात. या टास्क दरम्यान अपघात होतो आणि काही सदस्य पडून त्यांना दुखापत होते.

नुकताच घरामध्ये पहिला नॉमिनेशन टास्क पार पडला होता. तर मंगळावारी अवघ्या दुसऱ्या दिवशी बिग बॉसनी स्पर्धकांना एक नवा टास्क देऊ केला आहे. हा टास्क खूपच मजेशीर असणार आहे. या टास्कच नाव ऐकून सर्वानाच आपल्या बालपणीची आठवण होईल.

कारण या टास्कचं नाव आहे 'चिऊ ताई चिऊ ताई दार उघड'. हा टास्क नेमका काय आहे? किंवा नेमकं कोणतं काम यामध्ये करायचं आहे हे आपल्यला आजच्या भागामध्ये पाहायला मिळणार आहे.

नुकताच बिग बॉस मराठीचा नवा प्रोमो आपल्या समोर आला आहे. या प्रोमोनं सर्वांचीच उत्कंठा वाढवली आहे. या प्रोमोमध्ये सर्व पुरुष मंडळी महिलांजवळ जाऊन आपलं म्हणणं पटवून देण्याचा प्रयत्न करत आहेत. तर महिला प्रत्येकाचं म्हणणं ऐकून घेत आहेत.

प्रोमोमध्ये अविष्कार मीराला सांगत आहे, 'आम्ही तुमची सेवा करू इच्छितो' यावर मीरा म्हणत आहे , 'तुम्ही तर माझं ऐकतच नाही' तर घरातील इतर पुरुष स्पर्धक विशाल, जय, विकास, दादूस सर्वजण महिलांना त्यांची सेवा करण्याचं आश्वासन देत आहेत. त्यामुळे हा टास्क प्रत्यक्षात टीव्हीवर पाहताना मोठी मज्जा येणार आहे.हेही वाचा

चिऊ ताई चिऊ ताई दार उघड, घरात रंगणार नवा टास्क

अटकेचं भय! अखेर कंगना न्यायालयात हजर

संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा