ज्येष्ठ अभिनेत्री आशालता वाबगावकर यांना कोरोनाची लागण, प्रकृती चिंताजनक

ज्येष्ठ अभिनेत्री आशालता वाबगावकर यांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती मिळत आहे. 'आई माझी काळूबाई' या मालिकेच्या चित्रीकरणा दरम्यान त्यांना कोरोनाची लागण झाली.

या मालिकेच्या सेटवर तब्बल २७ जण कोरोना पॉझिटिव्ह आढळले आहेत. प्रकृती बिघडल्यानंतर आशालता यांना १६ सप्टेंबर रोजी वाई इथल्या प्रतिभा रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.

आशालता यांची प्रकृती चिंताजनक असून त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आलं आहे. आशालता वाबगावकर यांचा ऑक्सिजन लेव्हल कमी जास्त होत आहे. मुंबईहून काही दिवसांपूर्वी गाण्याचे शुटिंग करण्यासाठी सुमारे २० ते २२ लोक साताऱ्यातील फलटण इथं गेले होते. त्यानंतरच ही बातमी समोर आल्याचं बोललं जात आहे.

अलका कुबल या मालिकेत देवी काळूबाईची भूमिका साकारत आहेत. या मालिकेत अभिनेत्री आशालता वाबगावकरांचीही महत्त्वाची भूमिका आहे. साताऱ्याजवळ असलेल्या वाई जवळच्या हिंगोली या गावात एका फार्म हाऊसमध्ये या मालिकेचं शुटिंग सुरू होतं.

आशालता या गेली काही दिवस शुटिंगसाठी तिथेच होत्या. या मालिकेत एका गाण्याचं शुटिंग सुरू होतं. तिथं मुंबईवरून काही कलाकारांचा ग्रुप आला होता. त्याच वेळी त्यांना कोरोनाचा संसर्ग झाला असावा अशीही शक्यता व्यक्त केली जात आहे.


हेही वाचा

ड्रग्स प्रकरणात पोलिसांना नाव सांग, उर्मिलाचं कंगनाला खुलं आव्हान

फोटो शेअर करत कंगना म्हणाली, "हा बलात्कार आहे"

पुढील बातमी
इतर बातम्या