Advertisement

फोटो शेअर करत कंगना म्हणाली, "हा बलात्कार आहे"

अभिनेत्री कंगना रणौतनं मुंबईतील पालिकेच्या कारवाईच्या ८ दिवसांनी आपल्या ऑफिसची छायाचित्रं शेअर केली आहेत.

फोटो शेअर करत कंगना म्हणाली, "हा  बलात्कार आहे"
SHARES

अभिनेत्री कंगना रणौतनं मुंबईतील पालिकेच्या कारवाईच्या ८ दिवसांनी आपल्या ऑफिसची छायाचित्रं शेअर केली आहेत. यासह तिनं एकापाठोपाठ ३ ट्विट देखील केली आहेत. 'हा माझ्या स्वप्नांचा, माझ्या आत्मविश्वासाचा, माझ्या स्वाभिमानाचा आणि माझ्या भविष्याचा बलात्कार आहे,' असं कंगना म्हणाली आहे.

पालिकेनं ९ सप्टेंबर रोजी कंगनाच्या पाली हिल इथल्या ऑफिसमध्ये कारवाई केली होती. तिच्या कार्यालयातील बेकायदा बांधकामांवर हातोडा मारला होता. पालिकेच्या पथकानं सुमारे दोन तास जेसीबी मशीन, हातोडा आणि क्रेनच्या साहाय्यानं तोडफोड केली होती. त्याच्या दुसऱ्या दिवशी कंगना हिमाचलहून मुंबईला पोहोचली होती. मात्र, बीएमसीच्या कारवाईवर कंगनानं हायकोर्टात धाव घेतली आणि कोर्टानं कोर्टानं कारवाई थांबवली. आता या प्रकरणाची सुनावणी २२ सप्टेंबर रोजी होणार आहे.

दरम्यान पालिकेच्या कारवाईमुळे कंगनाला २ कोटींचा तोटा झाल्याचं वृत्त आहे. कंगनानं हे तीन मजली कार्यालय तयार करण्यासाठी सुमारे ४८ कोटी रुपये खर्च केले होते. १० सप्टेंबरला कंगना एक ट्विट करुन म्हणाली होती, माझं ऑफिस १५ जानेवारी रोजी सुरू होणार होते. मात्र त्याच काळात कोरोनाचे संकट आले, त्यामुळे आम्ही जे काही काम करायचे होते ते अर्ध्यावरच थांबवले होतं. परंतु, आता पुन्हा या कार्यालयाची डागडुजी करण्यासाठी किंवा ते उभारण्यासाठी माझ्याकडे पुरेसे पैसे नाहीत. पण एक सांगते, मीच याच उद्धवस्त झालेल्या, तोडलेल्या ऑफिसमधून काम करण्यास सुरुवात करेन. हे उद्धवस्त झालेले ऑफिस एक प्रतिक आहे, जी स्त्री या जगात स्थान निर्माण करण्याचा प्रयत्न करते तिच्यासोबत असंच होतं हे यातून सांगण्यात येतंय.”



हेही वाचा

अभिनेत्री रकुलप्रित सिंगची मीडियाविरोधात उच्च न्यायालयात धाव

कंगना म्हणते, उर्मिला मातोंडकर सॉफ्ट पॉर्न स्टार

Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा