Advertisement

ड्रग्स प्रकरणात पोलिसांना नाव सांग, उर्मिलाचं कंगनाला खुलं आव्हान

आता कंगनानं उर्मिलाला 'सॉफ्ट पॉर्न स्टार (Soft Porn Star)' म्हटलं. यानंतर उर्मिलानं कंगनाला पुन्हा एकदा प्रश्न विचारले आहेत.

ड्रग्स प्रकरणात पोलिसांना नाव सांग, उर्मिलाचं कंगनाला खुलं आव्हान
SHARES

बॉलिवूड  अभिनेत्री कंगना रणौतची (Kangana Ranaut) उर्मिला मातोंडकर (Urmila Matondkar) सोबत तू तू मै मै सुरू आहे. उर्मिला मातोंडकरनं जया बच्चन यांच्या वक्तव्याला पाठिंबा देत कंगना रनौत (Kangana Ranaut) वर निशाणा साधला होता. यानंतर आता कंगनानं उर्मिलाला 'सॉफ्ट पॉर्न स्टार (Soft Porn Star)' म्हटलं. यानंतर उर्मिलानं कंगनाला पुन्हा एकदा प्रश्न विचारले आहेत.

उर्मिला मातोंडकरने कंगना रणौतला खुलं आव्हान दिलं आहे. तिनं ड्रग्ज प्रकरणात सामील असलेल्या सेलिब्रिटींची नावं पुराव्यासह द्यावीत. यापूर्वी उर्मिलानं कंगनाच्या वक्तव्यावर सवाल उपस्थित केला आहे. कंगनाला चित्रपटसृष्टीतील प्रत्येकासोबत अडचण का आहे? असा सवाल तिनं उपस्थित केला आहे.

उर्मिला म्हणाली की, संपूर्ण बॉलिवूड ड्रग्समध्ये अडकल्याचं सांगण्यापेक्षा कंगनानं त्या मोठ्या फिल्म स्टार्सच्या नावांचा खुलासा करावा, ज्यांचा ड्रग्स प्रकरणात समावेश आहे. नावं कुठे आहेत? माझी इच्छा आहे की कंगनानं पुढे यावं आणि अशा सेलिब्रिटींची नावं सांगावीत. यासाठी सर्वात आधी मी तिला थम्स अप करेन.

कंगनानं आज सोशल मीडियावर उर्मिलाचा सॉफ्ट पॉर्न स्टार असा उल्लेख केला आहे. त्यावरुन सध्या मोठा गदारोळ झाला असून बॉलिवूडमधील अनेक सेलिब्रिटी उर्मिलाला पाठिंबा देण्यासाठी पुढे आली आहेत.

इंडिया टुडे चॅनलसोबत बातचीत करताना उर्मिलानं सांगितलं की, तुम्ही गेल्या १० वर्षांपासून ज्या क्षेत्रात काम करीत आहात अचानक तुम्हाला इथल्या प्रत्येक व्यक्तीची अडचण वाटू लागते. तुम्हाला हा निर्णय घ्यावा लागेल की तुम्हाला सातत्यानं विक्टिम कार्ड खेळायचं आहे का?



Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा