वर्षा-किशोरीच्या जुगलबंदीचा 'पियानो'!

एके काळी समांतर करीयर घडवणाऱ्या दोन अभिनेत्री किंवा अभिनेते कालांतराने जेव्हा एकत्र येत पुन्हा रसिकांचं मनोरंजन करण्यासाठी सज्ज होतात, तेव्हा सर्वांच्याच नजरा त्यांच्यावर खिळतात. वर्षा उसगावकर आणि किशोरी शहाणे या दोन अभिनेत्रीही एकत्र येत रसिकांचं मनोरंजन करणार आहेत.

दिग्गज अभिनेत्री रंगभूमीवर 

दोन दिग्गज कलाकार प्रथमच एकत्र आल्यावर जो काही अनुभव रसिक प्रेक्षक अनुभवतात तो प्रचंड आनंददायी असतो. मग हा अनुभव जर रंगभूमीवरचा असेल, तर तो अधिक रंगतदार, स्वर्णिम ठरतो. त्या दिग्गजांचा अभिनय, त्यांच्यातली संवादांची जुगलबंदी, विषयाच्या आशयाला आणि सादरीकरणाला अतुलनीय उंचीवर पोहोचवते. अगदी हाच आणि असाच एक सुखद अनुभव सर्व रसिक प्रेक्षकांसाठी घेऊन येत आहेत प्रस्तुतकर्ते चैतन्य गिरिश अकोलकर आणि डिजिटल डिटॉक्स ही निर्मिती संस्था 'पियानो फॉर सेल' या नाटकाद्वारे! या नाटकाच्या निमित्ताने वर्षा उसगांवकर आणि किशोरी शहाणे विज या दोन दिग्गज अभिनेत्री प्रथमच रंगभूमीवर एकत्र येत आहेत.

प्रथमच एकत्र

लेखिका मेहेर पेस्तोनजी यांनी लिहिलेल्या 'पियानो फॉर सेल' या मूळ इंग्रजी नाटकाचं नाट्य रुपांतर आणि दिग्दर्शन आशिष कुलकर्णी यांचं आहे. अत्यंत आगळ्यावेगळ्या विषयावरील या नाटकाचे प्रयोग १ डिसेंबरपासून संपूर्ण महाराष्ट्रासह परदेशातही करण्याचं प्रयोजन आहे. वर्षा आणि किशोरी यांच्याबद्दल बोलायचं तर दोघींचंही करीयर समकालीन आहे. दोघींनीही प्रथम मराठीत आणि नंतर हिंदीत आपल्या अभिनयाचा ठसा उमटवला आहे. असं असलं तरी या दोघीही यापूर्वी कधीच रंगभूमीवर एकत्र आलेल्या नाहीत. दोघींची नाटकाच्या निमित्ताने एकत्र येण्याची ही पहिलीच वेळ आहे.


हेही वाचा - 

EXCLUSIVE : तावडे पिता-पुत्राचा अजब योगायोग!

डेट विथ सई'मध्ये सईची मिरर इमेज!


पुढील बातमी
इतर बातम्या