डेट विथ सई'मध्ये सईची मिरर इमेज!

ही एक थरारक मालिका असणार आहे. यात सई आपल्या मिरर इमेजमध्ये अर्थात स्वत:च्याच म्हणजेच सई ताम्हणकरच्याच भूमिकेत दिसेल. सई ही पहिलीच भारतीय अभिनेत्री आहे, जी वेब सिरीजमध्ये स्वत:च्याच भूमिकेत दिसेल.

  • डेट विथ सई'मध्ये सईची मिरर इमेज!
  • डेट विथ सई'मध्ये सईची मिरर इमेज!
SHARE

आज जगभरातील प्रेक्षकांप्रमाणेच कलाकारांनाही वेब सिरीजचं प्रचंड आकर्षण आहे. हिंदीसह मराठीतील बऱ्याच कलाकारांनी आजच्या काळातील अॅडव्हान्स प्लॅटफॅार्म म्हणून ओळखल्या जाणाऱ्या वेब सिरीजच्या विश्वात पदार्पण करत रसिकांची दाद मिळवली आहे. आता मराठमोळी अभिनेत्री सई ताम्हणकरही वेब सिरीजच्या उंबरठ्यावर उभी आहे. 'डेट विथ सई' ही सईची पहिली वहिली वेब सिरीज लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.स्वत:च्याच भूमिकेत

सैफ अली खान, आर माधवन, भूमी पेडणेकर, नवाजुद्दीन सिद्दिकी, राधिका आपटे अशा बॉलीवूड सेलेब्सनी वेब सिरीजमध्ये काम केल्यावर आता 'डेट विथ सई' या वेब सिरीजमध्ये प्रेक्षकांना त्यांची आवडती सई ताम्हणकर दिसणार आहे. ५ डिसेंबरपासून सुरू होणाऱ्या या वेब सिरीजविषयी सर्वांनाच खूप उत्कंठा आहे. या वेब सिरीजशी निगडीत सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, ही एक थरारक मालिका असणार आहे. यात सई आपल्या मिरर इमेजमध्ये अर्थात स्वत:च्याच म्हणजेच सई ताम्हणकरच्याच भूमिकेत दिसेल. सई ही पहिलीच भारतीय अभिनेत्री आहे, जी वेब सिरीजमध्ये स्वत:च्याच भूमिकेत दिसेल.


थरारक वेब सिरीज

या वेब सिरीजमध्ये सईचा वेडसर फॅन तिचा पाठलाग करत असतो. जो सईच्या नकळत तिचं आपल्या मोबाइल कॅमेऱ्यात चित्रीकरण करत असतो. ही थरारक वेब सिरीज पाहताना प्रेक्षकांच्या अंगावर काटा येईल असं सांगत सई म्हणाली की, 'डेट विथ सई'सारखी थरारशैलीचा चित्रपट वा मालिका मी कधीच केली नव्हती. त्यामुळे ही वेब सिरीज माझ्यासाठी एक वेगळा अनुभव देणारी आहे. एका फॅनचं तुमच्यावरच प्रेम कसं जीवघेणंही ठरू शकतं, त्याची अनुभूती देणारी ही वेब सिरीज आहे.


डिसेंबरमध्ये येणार

'डेट विथ सई'द्वारे मी वेब सिरीजच्या विश्वात पाऊल ठेवत आहे. डिसेंबरमध्ये येणाऱ्या या वेब सिरीजची खूप उत्सुकतेने वाट पाहत असल्याचंही सई म्हणाली. लेखक-दिग्दर्शक ज्ञानेश झोटींगने या वेब सिरीजचं लेखन-दिग्दर्शन केलं आहे.हेही वाचा - 

अमृताने 'असा' साजरा केला बर्थ डे!

उपेंद्रचा अनोखा पोलिसी पॅटर्न
संबंधित विषय
ताज्या बातम्या