Advertisement

अमृताने 'असा' साजरा केला बर्थ डे!

अमृतासाठी यंदाचं वर्ष खूप खास गेलं आहे. हिंदीतील 'राझी', 'सत्यमेव जयते' हे सुपरहिट चित्रपट आणि 'डॅमेज्ड' या वेबसिरीजमुळे तिला बॉलिवूडमध्ये नवी ओळख प्राप्त झाली आहे. अमृताच्या या यशस्वी वाटचालीमध्ये तिच्या चाहत्यांनीदेखील मोलाची साथ दिली आहे. त्यामुळे, या सर्वांचे आभार व्यक्त करण्यासाठी यंदाचा वाढदिवस अमृताने खास आपल्या चाहत्यांसोबत साजरा केला.

अमृताने 'असा' साजरा केला बर्थ डे!
SHARES

मराठीतील सध्याची आघाडीची अभिनेत्री अमृता खानविलकर सध्या हिंदीतही लक्षवेधी अभिनय करत आहे. चाहत्यांसोबत बर्थ डे साजरा करत तिने पुन्हा एकदा लक्ष वेधून घेतलं आहे.


वर्ष खूप खास

अमृतासाठी यंदाचं वर्ष खूप खास गेलं आहे. हिंदीतील 'राझी', 'सत्यमेव जयते' हे सुपरहिट चित्रपट आणि 'डॅमेज्ड' या वेबसिरीजमुळे तिला बॉलिवूडमध्ये नवी ओळख प्राप्त झाली आहे. अमृताच्या या यशस्वी वाटचालीमध्ये तिच्या चाहत्यांनीदेखील मोलाची साथ दिली आहे. त्यामुळे, या सर्वांचे आभार व्यक्त करण्यासाठी यंदाचा वाढदिवस अमृताने खास आपल्या चाहत्यांसोबत साजरा केला.


ताजमध्ये पार्टी

सांताक्रूझ येथील ताज हॉटेलमध्ये पार पडलेल्या या बर्थ डे पार्टीचा तिच्या चाहत्यांनी मनमुराद आनंद लुटला. या पार्टीचं आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे, प्रसारवाहिन्या आणि वृत्तपत्र या माध्यमांऐवजी पहिल्यांदाच डिजिटल माध्यमांना महत्व देत त्यांना या खास पार्टीसाठी आमंत्रित करण्यात आलं होतं. चाहत्यांपर्यंत सर्वात जलद पोहोचणाऱ्या या डिजिटल माध्यमांसोबत अमृताने स्पेशल मीट अँड ग्रीटसाठी खास वेळ काढला.


विजयी स्पर्धकांचा समावेश

काही दिवसांपूर्वी इन्स्टाग्राम तसंच इतर सोशल नेटवर्किंग साईट्सवर घेण्यात आलेल्या, अमृताच्या चित्रपटांमधील गाण्यांवर आधारित '#अल्टिमेटफेनऑफअमृता' या स्पर्धेतील विजयी स्पर्धकांना या पार्टीत बोलावण्यात आलं होतं. या विजेत्यांची निवड खास अमृतानेच केली होती. 'मी जे काही आहे, ते केवळ माझ्या चाहत्यांमुळेच आहे. त्यांच्या अमाप प्रेमामुळे मी इथपर्यत पोहोचले आहे, अशा शब्दांत तिने चाहत्यांचे आभार मानले. तसंच या पुढेही अशीच साथ देण्याचं आवाहनही तिने चाहत्यांना केलं.



हेही वाचा-

अमृताचा दिवाळी लूक पाहिला का?

मला टेलिव्हिजनचा विसर पडलेला नाही: सतीश राजवाडे



संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा