Advertisement

अमृताचा दिवाळी लुक पाहिला का?

देश तसा वेष' म्हणतात ते खोटं नाही. सध्या हिंदीमध्ये नावारूपाला आलेल्या अमृतानेही या दिवाळीला आपला लुक बदलला आहे. पूर्वी दिवाळीच्या सणाला कित्येकदा मराठमोळ्या लुकमध्ये दिसणारी अमृता या दिवाळीत भारतीयच, पण काहीशा वेगळ्या लुकमध्ये दिसते.

अमृताचा दिवाळी लुक पाहिला का?
SHARES

मराठमोळी अभिनेत्री अमृता खानविलकर सध्या हिंदी चित्रपटसृष्टीत चांगलीच रुळली आहे. 'राजी' चित्रपटातील महत्त्वपूर्ण भूमिकेनंतर सध्या अमृताचं नाव चहूबाजूंना चांगलंच गाजत आहे. त्यामुळे या दिवाळीत तिचा लुक पाहण्याची उत्सुकता तिच्या चाहत्यांसोबत सर्वांना लागली होती.


लुक बदलला 

'देश तसा वेष' म्हणतात ते खोटं नाही. सध्या हिंदीमध्ये नावारूपाला आलेल्या अमृतानेही या दिवाळीला आपला लुक बदलला आहे. पूर्वी दिवाळीच्या सणाला कित्येकदा मराठमोळ्या लुकमध्ये दिसणारी अमृता या दिवाळीत भारतीयच, पण काहीशा वेगळ्या लुकमध्ये दिसते. महागडी चणिया चोळी परिधान केलेला आपला लुक अमृताने नुकताच शेअर केला आहे. यंदाच्या दिवाळीसाठी अमृताने आपल्या चाहत्यांना दिलेली ही खास भेट 'मुंबई लाइव्ह'च्या फॅालोअर्ससाठी सुखावणारी आहे.


चणिया-चोळीत अमृता

निळा आणि गुलाबी रंगांचं कॅाम्बिनेशन असलेल्या चणिया-चोळीत अमृताचं सौंदर्य अधिकच खुलून दिसत आहे. अमृता सध्या हिंदी चित्रपटांसोबतच काही मोजके मराठी चित्रपटही करत आहे. याशिवाय छोट्या पडद्यावरील एका मराठी रिअॅलिटी शोमध्येही ती झळकते आहे. बच्चे कंपनीमधील गायनाच्या कलागुणांना वाव देणाऱ्या या शोमध्ये ती दिग्दर्शक सतीश राजवाडेच्या साथीने परीक्षणाचं काम करत आहे.



हेही वाचा - 

शाहरूखचा 'झीरो' वादात; किरपानचं दृश्य हटवण्याची चरणसिंग सप्रांची मागणी




संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा