Advertisement

उपेंद्रचा अनोखा पोलिसी पॅटर्न

या चित्रपटात उपेंद्रने एका अशा पोलिस अधिकाऱ्याची भूमिका साकारली आहे. जो एन्काऊंटर करून नव्हे, तर एका अनोख्या पद्धतीने गुन्हेगारीचा खात्मा करत आपलं कर्तव्य कठोरपणे बजावतो. कडू नावाचा हा पोलिस अधिकारी उपेंद्रने आपल्या शैलीत साकारला आहे. यात कुठेही आततायीपणा नाही. अतिशय संयतपणे आणि विचारपूर्वक निर्णय घेणारा हा पोलिस अधिकारी कशा प्रकारे गुन्हेगारांच्या गळ्यांत त्यांच्याच तंगड्या अडकवतो ते पाहायला मिळेल.

उपेंद्रचा अनोखा पोलिसी पॅटर्न
SHARES

राष्ट्रीय पारितोषिक विजेता अभिनेता उपेंद्र लिमयेने आजवर नेहमीच विविधांगी भूमिका साकारण्याला प्राधान्य दिलं आहे. असं असलं तरी त्याने बऱ्याचदा राजकारणी आणि पोलीस अधिकारीही साकारले आहेत. या आठवड्यात प्रदर्शित हेणाऱ्या ‘मुळशी पॅटर्न’ या चित्रपटात उपेंद्रचा एक अनोखा पोलिसी पॅटर्न पाहायला मिळणार आहे.


ज्वलंत विषयावर भाष्य

लेखक प्रविण तरडेने ‘मुळशी पॅटर्न’चं लेखन केलं असून, ‘देऊळ बंद’च्या यशस्वी दिग्दर्शनानंतर या चित्रपटाच्या दिग्दर्शनाची जबाबदारीही सांभाळली आहे. या चित्रपटात त्याने एका ज्वलंत विषयावर भाष्य करण्याचा प्रयत्न केला आहे. शेतकरी आणि जमिनी यांचं आजच्या काळातील नातं आणि त्याला लागलेलं शहरीकरणाचं ग्रहण या चित्रपटात आहे. यामुळे शेतकऱ्यांना कशा प्रकारे विस्थापितांचं जीणं जगावं लागतं त्याची कथा ‘मुळशी पॅटर्न’ या चित्रपटात आहे.


गुन्हेगारीचा खात्मा

या चित्रपटात उपेंद्रने एका अशा पोलिस अधिकाऱ्याची भूमिका साकारली आहे. जो एन्काऊंटर करून नव्हे, तर एका अनोख्या पद्धतीने गुन्हेगारीचा खात्मा करत आपलं कर्तव्य कठोरपणे बजावतो. कडू नावाचा हा पोलिस अधिकारी उपेंद्रने आपल्या शैलीत साकारला आहे. यात कुठेही आततायीपणा नाही. अतिशय संयतपणे आणि विचारपूर्वक निर्णय घेणारा हा पोलिस अधिकारी कशा प्रकारे गुन्हेगारांच्या गळ्यांत त्यांच्याच तंगड्या अडकवतो ते पाहायला मिळेल.


गोड बोलणारा कडू

या पोलिस अधिकाऱ्याचं नाव कडू असलं तरी हा गोड बोलणारा असल्याचं ‘मुंबई लाइव्ह’ला सांगत उपेंद्र म्हणाला की, ''प्रविणने वास्तववादी चित्र पडद्यावर मांडण्याचा प्रयत्न या चित्रपटात केला आहे. यातील पोलिस अधिकारी आजवर साकारलेल्या भूमिकांपेक्षा खूपच वेगळा असल्याची जाणीव झाल्यानेच ही आफर स्वीकारली. हा गुन्हेगारांनाही एक संधी देतो. गोड बोलून त्यांचं मन वळवण्याचा प्रयत्न करतो. त्यानंतरही तो ऐकला नाही, तर आपल्या स्टाइलने धडा शिकवतो. पोलिसी खाक्या न दाखवता तो शहरातील गुन्हेगारी कशा प्रकारे साफ करतो ते पाहण्याजोगं आहे'' असंही उपेंद्र म्हणाला.


या चित्रपटाची कथा, पटकथा, संवाद आणि दिग्दर्शन प्रविणनेच केलं आहे. उपेंद्रच्या जोडीला या चित्रपटात ओम भूतकर, मोहन जोशी, महेश मांजरेकर, प्रविण तरडे, मालविका गायकवाड, सविता मालपेकर, सुनील अभ्यंकर, क्षितीश दाते, रमेश परदेशी, देवेंद्र गायकवाड, सुरेश विश्वकर्मा, दीप्ती धोत्रे, मिलिंद दास्ताने, अजय पुरकर, जयेश संघवी, अक्षय टंकसाळे, आर्यन शिंदे आदी कलाकारांच्याही भूमिका आहेत.



हेही वाचा-

EXCLUSIVE : तावडे पिता-पुत्राचा अजब योगायोग!

'नशीबवान' भाऊचा 'ब्लडी फूल...' परफॉर्मन्स



संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा