Advertisement

'नशीबवान' भाऊचा 'ब्लडी फूल...' परफॉर्मन्स

भाऊची मुख्य भूमिका असलेला 'नशीबवान' हा चित्रपट प्रदर्शनासाठी सज्ज आहे. अमोल वसंत गोळे यांनी दिग्दर्शित केलेल्या या चित्रपटामधील 'ब्लडी फूल जिया रे...' हे गाणं भाऊवर चित्रीत करण्यात आलं आहे.

'नशीबवान'  भाऊचा 'ब्लडी फूल...' परफॉर्मन्स
SHARES

विनोदी अभिनेता भाऊ कदमची सध्या चांगलीच चलती आहे. 'चला हवा येऊ द्या' असं म्हणत महाराष्ट्रातील तमाम प्रेक्षकांच्या मनात घर करणारा भाऊ सहाय्यक भूमिकांसोबतच अधूनमधून मुख्य व्यक्तिरेखांमध्येही झळकतो. 'नशीबवान' या आगामी मराठी चित्रपटाची कथा भाऊने साकारलेल्या व्यक्तिरेखेभोवती फिरणारी असून यात त्याचा 'ब्लडी फूल...' परफॅार्मन्स प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे.


उडत्या चालीचं गाणं 

भाऊची मुख्य भूमिका असलेला 'नशीबवान' हा चित्रपट प्रदर्शनासाठी सज्ज आहे. अमोल वसंत गोळे यांनी दिग्दर्शित केलेल्या या चित्रपटामधील 'ब्लडी फूल जिया रे...' हे गाणं भाऊवर चित्रीत करण्यात आलं आहे. भाऊचा जबरदस्त परफॅार्मन्स असलेलं हे गाणं नुकतंच रिलीज झालं आहे. उडत्या चालीचं हे गाणं आनंद शिंदे यांनी स्वरबद्ध केलं असून, सोहम पाठक यांनी संगीतबद्ध केलं आहे. शिवकुमार ढाले यांनी हे गाणं लिहिलं आहे. या गाण्याचं नृत्यदिग्दर्शन विठ्ठल पाटील यांनी केलं आहे.


डान्स बारमध्ये चित्रीकरण

या  गाण्याचं चित्रीकरण कोणत्याही सेटवर केलेलं नसून एका खऱ्याखुऱ्या डान्स बारमध्ये करण्यात आलं आहे. हा डान्स बार फक्त चोवीस तासांसाठीच उपलब्ध होणार होता. या चोवीस तासात चित्रपटातील महत्त्वाच्या गाण्याचं शूटिंग करणं हे 'नशीबवान'च्या टीम समोर आव्हान होतं, परंतु हे आव्हान या टीमने लीलया पेललं.


११ जानेवारीला प्रदर्शित

विशेष म्हणजे ज्या डान्स बारमध्ये हे चित्रीकरण सुरु होतं त्या बारबाहेर कोणालाही कल्पना नव्हती कि इथे सिनेमाचे शूटिंग चालू आहे. या गाण्यामध्ये आनंद शिंदे याची एक खास झलकसुद्धा पहायला मिळणार आहे. उदय प्रकाश लिखित 'दिल्ली की दीवार' या कथेवर आधारीत असलेला 'नशीबवान'  हा चित्रपट ११ जानेवारी रोजी प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे.



हेही वाचा - 

'झिरो' विरोधातील याचिकेवर ३० नोव्हेंबरला सुनावणी

'आरॉन'ने जमवली दोन पुणेकरांची जोडी




संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा