बेस्टच्या १५९ बस जाणार भंगारात

आर्थिक संकटात सापडलेल्या बेस्ट प्रशासनाला जुन्या बस गाड्याचा दुरुस्तीचा खर्च परवडणारा नसल्यामुळे या गाड्या भंगारात काढण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे. त्यानुसार बेस्ट प्रशासन १४ वर्षे व त्यापेक्षा जुन्या बस गाड्या टप्प्याटप्प्याने भंगारात काढणार आहे.

मुंबईत धावणार ३ हजार ३३७ बस

बेस्ट उपक्रमाच्या ताफ्यात एकूण ३ हजार ४९६ बस आहेत. यापैकी १५९ बस भंगारात जाणार असल्याने बेस्टच्या ताफ्यात ३ हजार ३३७ बस उरणार आहेत. यापैकी २५ हायब्रीड बस असून २ इलेक्ट्राॅनिक बसचा समावेश आहे.

वर्षभरात टप्प्याटप्प्याने जुन्या बस भंगारात काढण्यात येणार असल्याचं, बेस्ट आयुक्त सुरेंद्र बागडे यांनी सांगितलं.

'अशा' जाणार बेस्ट भंगारात:

  • मे २०१८ - १
  • जून - १७
  • जुलै - २४
  • ऑगस्ट - २६
  • सप्टेंबर - १६
  • ऑक्टोबर - २५
  • नोव्हेंबर - २२
  • डिसेंबर - २८

एकूण - १५९


हेही वाचा-

बेस्ट कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी, बोनस कापणार नाही!

आता बेस्टमध्ये पुन्हा वाजणार टीक् टीक्!


पुढील बातमी
इतर बातम्या