Advertisement

बेस्ट कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी, बोनस कापणार नाही!


बेस्ट कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी, बोनस कापणार नाही!
SHARES

'बेस्ट कर्मचाऱ्यांना दिवाळीत देण्यात आलेला बोनस पगारातून कापला जाणार नाही', असे आश्वासन पालिका आयुक्त अजोय मेहता यांनी दिले आहे. या निर्णयामुळे बेस्ट कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. या विषयावर बेस्ट समिती अध्यक्ष अनिल कोकीळ आणि पालिका आयुक्त अजोय मेहता यांच्यात बैठक झाली होती. या बैठकीत आयुक्तांनी अनिल कोकीळ यांना हे आश्वासन दिले.


५ हजार ५०० रूपये दिला होता बोनस

दिवाळीत कर्मचाऱ्यांनी बोनस नाही मिळाला, तर संपावर जाण्याचा निर्णय घेतला होता. पण बेस्टची आर्थिक परिस्थिती बिकट असल्यामुळे मुंबई पालिकेने बेस्टला 21 कोटी 64 लाख रूपये दिले होते. कर्मचाऱ्यांची दिवाळी गोड व्हावी, यासाठी 45 हजार कर्मचाऱ्यांना प्रत्येकी 5 हजार 500 रूपये बोनस म्हणून देण्यात आले होते. हा दिलेला बोनस कर्मचाऱ्यांच्या पगारातून कापला जाईल, असेही त्यावेळी सांगण्यात आले होते.


८०% आर्थिक सुधारणांमुळे वाचला बोनस!

मात्र, ज्यावेळी बोनस दिला, तेव्हा पालिकेने बेस्टमध्ये आर्थिक सुधारणा सादर झाल्या नाहीत, तर हा बोनस कर्मचाऱ्यांच्या पगारातून कापला जाईल, असे सांगितले होते. पण पालिका आयुक्त आणि बेस्ट समिती अध्यक्ष यांच्यात झालेल्या बैठकीत अनिल कोकीळ यांनी बेस्टच्या कारभारात 80 टक्के आर्थिक सुधारणा सुचवल्या. त्यामुळे आयुक्तांनी बोनस कापण्याचा निर्णय मागे घेतल्याचे स्पष्ट केले.


Read this story in English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा