विना FASTag लेनमध्ये घुसले, २० कोटीची वसुली

नॅशनल हायवे अॅथाॅरिटी ऑफ इंडियानं गाडीला फास्टॅग बंधनकारक केलं आहे. पण असं असतानाही अनेक गाड्यांनी फास्टॅग लावलं नाही. याचा परिणाम १८ लाख वाहन चालकांकडून जवळपास २० कोटी रुपये दंड म्हणून वसूल केले आहेत. हे वाहन चालक फास्टॅग न लावता टोल नाक्यावरील फास्टॅग लेनमधून जात होते. नॅशनल हायवे अॅथॉरिटी ऑफ इंडियानं (NHAI) यासंदर्भात माहिती दिली.

फास्टॅग नसेल तर...

गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये रस्ते वाहतूक मंत्रालयानं डिझिटल टोल वसुलीसाठी फास्टॅग सुरू केलं. त्यानंतर मंत्रालयानं असं म्हटलं होतं की, जर एखादे वाहन फास्टॅग शिवाय टोल नाक्यावर आले तर दुप्पट शुल्क आकारले जाईल. त्यानुसार फास्टॅग शिवाय फास्टॅगच्या लेनमध्ये जाणाऱ्या वाहनांकडून दोन वेळा टोल आकारला जात असल्याचं प्राधिकरणानं म्हटलं आहे. ते म्हणाले की, आतापर्यंत देशभरातील १८ लाख वाहनांनी टॅगविना फास्टॅग लेनमध्ये प्रवेश करण्याचा प्रयत्न केला. त्यांच्याकडून २० कोटी रुपये वसूल करण्यात आले आहेत. आतापर्यंत देशभरात १.५५ कोटीहून अधिक फास्टॅग जारी करण्यात आले आहेत.

फास्टॅग कसे काम करते?

फास्टॅग हा रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालय आणि (NHAI)चा एक उपक्रम आहे. हे डिझिटल टोल वसुल करण्यासाठीचं एक तंत्र आहे. रेडिओ फ्रिक्वेन्सी आयडेंटिफिकेशन टॅग, जो वाहनांच्या पुढच्या काचेवर बसवला जातो. जेणेकरून टोल नाक्यावरून जाताना सेन्सर द्वारे फास्टॅग रीड केला जाईल. फास्टॅगशी संबंधित तुमच्या बँक खात्यातून टोल आपोआप वजा केला जाईल. मार्च २०२० पर्यंत फास्टॅगच्या वापरावर २.५ टक्के कॅशबॅक येईल, जो थेट लिंक केलेल्या बँक खात्यात जमा होईल

फास्टॅग कसं मिळवाल?

आपण नवीन कार खरेदी करतानाच डीलरकडून फास्टॅग मिळवू शकता. जुन्या वाहनांसाठी ते राष्ट्रीय महामार्गाच्या पॉईंट ऑफ सेल (पीओएस) वरून खरेदी केला जाऊ शकतो. याशिवाय तुम्ही खासगी बँकांकडूनही फास्टॅग खरेदी करू शकता. पेटीएमवरून आपण फास्टॅग देखील खरेदी करू शकता. जर आपण विक्रीच्या ठिकाणाहून फास्टॅग खरेदी करत असाल तर वाहनाचे आरसी, मालकाचा फोटो आणि केवायसी कागदपत्र तिथं असावेत. यामध्ये तुम्ही ड्रायव्हिंग लायसन्स, पॅनकार्ड, पासपोर्ट, मतदार ओळखपत्र किंवा आधार कार्ड दाखवू शकता.

कुठल्या टोलवर वसुली

वाशी, ऐरोली, मुलुंड, एलबीएस मार्ग आणि दहिसर अशा ५ ठिकाणी मुंबईच्या एंट्री पॉइंटवर टोल नाके आहेत. तसंच, मुंबईमध्ये वांद्रे- वरळी सीलिंक या मार्गावरही टोल नाका आहे. या नाक्यांवर फास्टॅग सेवा सुरू केली आहे. ५ टोल नाक्यांवर अद्याप फास्टॅग सुविधा सुरू केलेली नाही.


हेही वाचा

महिनाअखेरपर्यंत सर्व टोल नाक्यांवर सुरू होणार फास्टॅग

सैन्य आणि पोलिसांच्या गाड्यांना फास्टॅग बंधनकारक

पुढील बातमी
इतर बातम्या