Advertisement

महिनाअखेरपर्यंत सर्व टोल नाक्यांवर सुरू होणार फास्टॅग

मुंबईतील ५ ही टोल नाक्यांवर या महिन्याच्या अखेरपर्यंत फास्टॅगची सुविधा (Fastag System) सुरू करण्यात येणार आहे.

महिनाअखेरपर्यंत सर्व टोल नाक्यांवर सुरू होणार फास्टॅग
SHARES

टोलनाक्यांवरील वाहनांच्या रांगा कमी करण्यासाठी व टोल नाक्यांवरील टोलवसुलीत पारदर्शकता यावी यासाठी केंद्र सरकारनं (Central Government) टोलवसूलीसाठी 'फास्टॅग' (Fastag) ही यंत्रणा बंधनकारक केली. महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळातर्फे (MMRDC) मुंबईतील ५ ही टोल नाक्यांवर या महिन्याच्या अखेरपर्यंत फास्टॅगची सुविधा (Fastag System) सुरू करण्यात येणार आहे.

फास्टॅगची सुविधा सुरू केल्यावर या सुविधेचा वापर न करणाऱ्या वाहन चालकांना (Driver) दुप्पट टोल भरावा लागणार आहे. याबाबत एमएसआरडीसीमार्फत योजना तयार करण्यात येत आहे. राज्याच्या सर्व टोल नाक्यांवर फास्टॅग लागू करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. त्यानुसार, सर्व टोल नाक्यांवर फास्टॅग लागू झाल्यावर जर फास्टॅग सुविधेचा वापर केला नाही, तर वाहनचालकाला दुप्पट टोल भरावा लागणार आहे.

मुंबई-पुणे एक्स्प्रेस हाय-वे (Mumbai-Pune Express highway) आणि वांद्रे- वरळी सीलिंक (Bandra-Worli Sea-link) मार्गावर फास्टॅग सुविधा सुरू करण्यात आली आहे. सध्या फास्टॅग नसलेल्या वाहनांना सीलिंक आणि मुंबई-पुणे एक्स्प्रेस हायवेवर परवानगी देण्यात आली आहे. मात्र, ही सूट काही दिवसांपुरतीच असणार आहे.

वाशी, ऐरोली, मुलुंड, एलबीएस मार्ग आणि दहिसर अशा ५ ठिकाणी मुंबईच्या एंट्री पॉइंटवर टोल नाके आहेत. तसंच, मुंबईमध्ये वांद्रे- वरळी सीलिंक या मार्गावरही टोल नाका आहे. या नाक्यांवर फास्टॅग सेवा सुरू केली आहे. ५ टोल नाक्यांवर अद्याप फास्टॅग सुविधा सुरू केलेली नाही.

या नाक्यांवरून दररोज हजारो वाहने ये-जा करतात. पिक अवरमध्ये रोज या नाक्यांवर वाहनांच्या लांबलचक रांगा लागतात. या रांगांना कमी करण्यासाठी सरकारने फास्टॅग सुविधेमार्फत टोल वसूल करण्याचा निर्णय घेतला आहे.



हेही वाचा -

सेवानिवृत्तीचं वय वाढवा, सरकारी कर्मचाऱ्यांची मागणी

'मुंबई आय’ चं ठिकाण बदला, कंपन्यांची एमएमआरडीएला सूचना



संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा