Advertisement

'मुंबई आय’ चं ठिकाण बदला, कंपन्यांची एमएमआरडीएला सूचना

लंडन आय (London Eye) च्या धर्तीवर वांद्रे (bandra) येथे 'मुंबई आय’ (mumbai eye) योजना राबवण्याचं प्रस्तावित आहे. मात्र, आता या योजनेचं ठिकाण बदल्याची शक्यता आहे.

'मुंबई आय’ चं ठिकाण बदला, कंपन्यांची एमएमआरडीएला सूचना
SHARES

लंडन आय (London Eye) च्या धर्तीवर वांद्रे (bandra) येथे 'मुंबई आय’ (mumbai eye) योजना राबवण्याचं प्रस्तावित आहे. मात्र, आता या योजनेचं ठिकाण बदल्याची शक्यता आहे. वांद्रे पूर्व येथे प्रस्तावित असलेल्या 'मुंबई आय’ प्रकल्पामुळे येथील वाहतूक कोंडीमध्ये आणखी भर पडेल. तसंच १ एकर जमीन या योजनेसाठी पुरेशी नाही. त्यामुळे ही योजना मुंबईत इतर ठिकाणी राबवावी, असं या योजनेसाठी इच्छुक असलेल्या कंपन्यांनी म्हटलं आहे. 

मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (mmrda-एमएमआरडीए) ‘मुंबई आय’ (mumbai eye) योजना राबवणार आहे. १३ वर्षापूर्वी ही योजना राबवण्यात येणार होती. मात्र, आतापर्यंत ही योजना बारगळली आहे. राज्यात नवीन सरकार आल्यानंतर आता पुन्ही ही योजना राबवण्यासाठी पावलं उचलण्यात आली आहेत.  ‘मुंबई आय’ साठी ८ कंपन्या इच्छुक आहेत. नुकतीच एमएमआरडीएची या कंपन्यांबरोबर बैठक झाली. बैठकीत या कंपन्यांनी ही योजना वांद्रे ( (bandra)) येथे न राबविता इतर भागांमध्ये राबवावी, अशी सूचना केली आहे. 

‘मुंबई आय’ (mumbai eye) ची उंची, पार्किंग व्यवस्था आणि निर्मिती कार्याचा कालावधी निश्चित करण्याचा सल्लाही कंपन्यांनी एमएमआरडीए (mmrda) दिला. निर्मितीसाठी लागणाऱ्या मशिनींवर इंपोर्ट ड्युटीवर सूट देण्याची मागणी करत कंपन्यांनी तिकिटांच्या विक्रीच्या व्यतिरिक्त मुंबई आयजवळ वॉटर स्पोर्ट सुरू करण्याचेही सुचविले आहे. ‘लंडन आय’आणि ‘दुबई व्हील’ या प्रकल्पाची उभारणी करणाऱ्या कंपनीने ‘मुंबई आय’ योजनेमध्ये रस दाखविला आहे.हेही वाचा -

कुर्ल्यातील महिला अडकली सिरियात

खासगी सेवेचा एसटीच्या शिवनेरी बसला फटका
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा