Advertisement

खासगी सेवेचा एसटीच्या शिवनेरी बसला फटका

एसटीच्या एसी शिवनेरी बससमोर (Shivneri Bus) आता खासगी प्रवासी (Private bus) वाहतुकीचं मोठं आव्हान आहे.

खासगी सेवेचा एसटीच्या शिवनेरी बसला फटका
SHARES

मुंबई, ठाणे ते पुणे मार्गावर सेवा देणाऱ्या एसटीच्या (ST) एसी शिवनेरी बससमोर (Shivneri Bus) आता खासगी प्रवासी (Private bus) वाहतुकीचं मोठं आव्हान आहे. 'बस फॉर अस फाऊंडेशन' (Bus for ous foundation) या संस्थेनं मुंबई, ठाणे ते पुणे (Thana to pune) मार्गावर धावणाऱ्या शिवनेरीचं सर्वेक्षण केलं. त्यांच्या या सर्वेक्षण अहवालानुसार खासगी क्षेत्रातील बसमुळं एसटीच्या शिवनेरी सेवेला प्रवाशांचा कमी प्रतिसाद मिळत आहे.

शिवनेरीच्या प्रवासी (Passengers) संख्येत मोठी घट झाली. ही भरून काढण्यासाठी एसटी महामंडळानं (Maharashtra State Road Transport Corporation) प्रवासी तिकीट (Ticket) कमी करण्याचा निर्णय घेतला. मात्र तिकीट दर कमी केल्यानंतरही प्रवासी संख्येत वाढ होत नाही. त्यामुळं शिवनेरीची (Shivneri) सेवा टिकवताना एसटी महामंडळालाही बरेच बदल करण्याचे गरजेचे असल्याचं निरीक्षण या अहवालात नोंदवण्यात आलं आहे.

काही प्रवासी खाद्यपदार्थ, प्लास्टिक, कागद बसमध्येच टाकतात. परिणामी बस साफ न राहिल्यानं पुढील प्रवाशांना अस्वच्छ बसमधून प्रवास करणं भाग पडते. याकडं एसटी महामंडळही (Maharashtra State Road Transport Corporation) दुर्लक्ष करत असल्याचं समजतं. रोजच्या प्रवासानंतर खराब झालेल्या बस, मळकटलेली आसनं, पडदे या गोष्टी ठरावीक काळानंतर स्वच्छ धुतल्या जाणं गरजेचं असताना वर्षांनुवर्षे तशाच घाणेरड्या अवस्थेत असतात.

उशिरा सुटणाऱ्या किंवा रद्द झालेल्या गाड्यांचा सर्वात जास्त फटका आरक्षण केलेल्या प्रवाशांना बसतो. आरक्षण केलेल्या प्रवाशांना त्यांच्या वेळेच्या आधी आलेल्या गाडीत मोकळी जागा असतानादेखील जागा न दिल्याच्या अनेक घटना वाकड, चांदणी चौक भागात होतात. त्याशिवाय आरक्षण करताना सव्‍‌र्हरमध्ये तांत्रिक समस्या येऊन पैसे वजा होऊन आरक्षण न होणं, संदेश न येणं, मेल न येणं असेही प्रकार घडत असतात.हेही वाचा -

कुर्ल्यातील महिला अडकली सिरियात

सायन उड्डाणपूलीची दुरूस्ती बाकी, प्रवाशांची गैससोयसंबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा