कुर्ल्यातील महिला अडकली सिरियात

२०१७मध्ये इसिसच्या विरोधातील फौजांनी रक्कावर हल्ला केला व एका बॉम्ब हल्ल्यात हौजेफचा मृत्यू झाला

कुर्ल्यातील महिला अडकली सिरियात
SHARES

इसिस या दहशतवादी संघटनेचे केंद्र म्हणून ओळखल्या जाणाऱ्या परिसरात मुंबईच्या कुर्ला येथील तरुणी अडकली आहे.  स्वतःच्या कुर्दीश शरणार्थी कँपमधून सुटकेसाठी तरुणीने आता राज्याच्या अल्पसंख्याक आयोगाने केंद्रीय विदेश सचिव आणि राज्याच्या गृहमंत्र्यांना पत्र लिहून मदत मागितली आहे. एका इंग्रजी मासिकाने तरुणीच्या वेदना आपल्या मालिकात प्रसिद्ध केल्यानंतर तरुणीच्या मदतीसाठीचे प्रयत्न आता सुरू झाले आहेत. कुर्लाच्या पश्चिमेला राहणारा हौजेफा या तरुणाने २०१४ मध्ये फातिमा हिच्याशी लग्न केले. बहरिन येथे तो नोकरीला असल्याने  तो आपल्या पत्नीसोबत मध्यपूर्वेत फिरण्यासाठी गेला होता. त्या ठिकाणी त्याच्या मित्रांनी त्याची राहण्याची व्यवस्था केली होती. त्या ठिकाणी तीनमहिने वास्तव्य केल्यानंतर हौजेफा पत्नी फातिमाला घेऊन तुर्कस्थानची राजधानी इस्तांबूलमध्ये गेला. हौफेजा हा वारंवार त्याच्या मित्राच्या संपर्कात होता. ते सांगतिल त्या प्रमाणेतो वागत होता. त्या दरम्यान सीरियामध्ये इस्लामिक स्टेटने युद्ध पुकारले होते. त्यावेळी पत्नी फातिमाने त्याला घरी जाण्यासाठी तगादा लावला होता. मात्र आपण चांगल्या कामाच्या शोधात येथे आलो असून काही दिवस येथेच थांबावे लागेल यावर तो ठाम होता.  तेल अबैद या सीरियातील ठिकाणी ते आले. रक्का या सीरियातील परगण्यात येणारे हे ठिकाण आयएसच्या अधिपत्याखाली आले होते. इथे हौजेफाला छोटे मोठे काम मिळाले. हौजेफा नक्की काय करतो याची फातिमाला कल्पना नव्हती. 

हेही वाचाः- अश्लील व्हिडिओ सोशल मिडियावर टाकण पडले महागात

२०१७मध्ये इसिसच्या विरोधातील फौजांनी रक्कावर हल्ला केला व एका बॉम्ब हल्ल्यात हौजेफचा मृत्यू झाला. रक्का आयएसच्या हातातून गेल्यानंतर काही महिलांसमवेत फातिमा बागोझ या सीरियातील शहरात गेली. तिथे ती कुर्दीश लष्कराच्या ताब्यात ती सापडली.  त्यानंतर तिची रवानगी कुर्दीश शरणार्थी कँपमध्ये झाली. या दरम्यान तिला हौजेफपासून तीन मुलेही झाली. सध्या ती व तिची मुले कुर्दीश शरणार्थी कँपमध्ये राहत आहेत. सुटकेसाठी तिचे शर्तीचे प्रयत्न सुरू असल्याची माहिती एका भारतीय पत्रकाराने मासिकात लिहिल्यानंतर हे प्रकरण उजेडात आले. त्यानंतर फातिमा आणि तिच्या मुलांना भारतात आणण्यासाठीचे प्रयत्न कुटुंबियांनी सुरू केले. तिच्या कुटुंबियांनी  परराष्ट्र सचिवांना पत्र लिहून तिला परत आणण्यासाठी विनंती केली. त्याच बरोबर फातिमाच्या कुटुंबियांनी राज्याचे अतिरिक्त मुख्य सचिव (गृह), पोलिस मंहासंचालक, मुंबईचे पोलिस आयुक्त, दहशतवाद विरोधी पथकाचे अतिरिक्त पोलिस महासंचलक यांनाही शरणार्थी कँपमध्ये अडकलेल्या या महिलेला परत आणण्याविषयी पत्र लिहिले आहे.

हेही वाचाः- राणीच्या बागेतील 'या' प्राण्याचा मृत्यू


संबंधित विषय