Advertisement

राणीच्या बागेतील 'या' प्राण्याचा मृत्यू

भायखळा (Byculla) येथील वीरमाता जिजाबाई भोसले उद्यानात बाराशिंगाच्या मादीचा (female antelope) मृत्यू झाल्याची माहिती समोर येत आहे

राणीच्या बागेतील 'या' प्राण्याचा मृत्यू
SHARES

मुंबईतल्या भायखळा (Byculla) येथील वीरमाता जिजाबाई भोसले उद्यानात बाराशिंगाच्या मादीचा (female antelope) मृत्यू झाल्याची माहिती समोर येत आहे. या मादीचे शवविच्छेदन (postmortem) केलं असता तिच्या छातीवर मार बसल्याचे व्रण दिसून आले. तसचं, हृदयक्रिया बंद पडल्यानं या मादीचा मृत्यू झाल्याचं शवविच्छेदन अहवालात म्हटलं आहे. याआधी राणीच्या बागेत (Rani baug) आलेल्या पेंग्वीनचाही मृत्यू झाला होता. 

भायखळ्यातील (Byculla) राणीच्या बागेत सध्या नवनवीन प्राण्यांच्या जोड्यांचं आगमन होत आहे. हे पाहण्यासाठी मुंबईसह अनेक ठिकाणीहून आलेली लोक राणीच्या बागेत गर्दी करतात. प्राण्यांचे (Animals) सर्व पिंजरे अनेक वर्षांनी गजबजू लागले आहेत. मात्र, शुक्रवारी रात्री बाराशिंगाच्या (antelope) जोडीतील मादीचा अचानक मृत्यू झाला.

बाराशिंगाचा गेल्या काही दिवसांपासून 'प्री-मेटिंग'चा काळ सुरू होता. या दरम्यान रात्री या ३ वर्षीय मादीचा मृत्यू झाल्याची माहिती मिळते. दुसऱ्या दिवशी सकाळी प्राणिसंग्रहालयाच्या कर्मचाऱ्यांना मादी निपचित पडलेली आढळली. या मादीचे शवविच्छेदन केलं असता तिच्या छातीवर मार बसल्याचं व्रण दिसून आलं असून, हृदयक्रिया बंद पडल्यानं या मादीचा मृत्यू झाल्याचं शवविच्छेदन अहवालात स्पष्ट करण्यात आलं.

नर हा मादीपेक्षा वजनानं जास्त असल्यामुळं प्रणयक्रीडेच्या वेळी आक्रमक झालेल्या नराच्या हल्ल्यामुळं ही मादी जखमी होऊन मृत्युमुखी (Death) पडली असावी, असा निष्कर्ष काढण्यात आला आहे. 

राणीची बागेत (Rani baug) येणाऱ्या पर्यटकांना आता वाघांचं दर्शन घडणार आहे. औरंगाबाद इथल्या सिद्धार्थ उद्यानातून करिष्मा (मादी)आणि शक्ती (नर) हे २ पट्टेरी वाघ (Tiger) इथं आणण्यात आले आहेत. लवकरच हे वाघ पर्यटकांना जवळून पाहता येणार आहेत. दिल्लीतील केंद्रीय प्राणिसंग्रहालय प्राधिकरणाच्या मंजुरीनंतर त्यांना भायखाळातल्या प्राणिसंग्रहालयात आणण्यात आलं.हेही वाचा -

सायन उड्डाणपूलीची दुरूस्ती बाकी, प्रवाशांची गैससोय

अश्लील व्हिडिओ सोशल मिडियावर टाकण पडले महागातसंबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा