राज्यभरात पहिल्याच दिवशी ३,५०० जणांना घरबसल्या शिकाऊ लायसन्स

घरबसल्याही शिकाऊ लायसन्सची परीक्षा देता यावी यासाठी परिवहन विभागाने सोमवारपासून नवीन सुविधा सुरू केली. यात मंगळवारी राज्यात ३,५२७ जण शिकाऊ लायसन्सची परीक्षा घरबसल्या पास झाल्याचे परिवहन विभागाकडून सांगण्यात आले. शिकाऊ लायसन्सची परीक्षा देण्यासाठी अनेकांना आरटीओत जावे लागते.

परीक्षेसाठी वेळ घेण्यासाठी बराच खटाटोप करावा लागतो. यातून सुटका करण्यासाठी परिवहन विभागाने घरबसल्या परीक्षा देण्याची संकल्पना सोमवारपासूून अमलात आणली. यात परिवहनच्या संकेतस्थळावर जाऊन प्रक्रिया पार पाडावी लागत आहे. त्यासाठी आधार क्रमांक जोडावा लागतो.

पुणे आरटीओअंतर्गत ३०७ परीक्षार्थी होते. तर नाशिक आरटीओंतर्गत २२२ जण असल्याचे सांगण्यात आले. मुंबईतील ताडदेव आरटीओंतर्गत १९१ जणांची नोंद झाली असून अंधेरी आरटीओत १४२, वडाळा आरटीओत १६० आणि ठाणे आरटीओत १७५ जणांनी परीक्षा दिल्या. तर घरबसल्या परीक्षा देऊन पास होणाऱ्यांच्या संख्येत पुणे, नाशिक, पिंपरी चिंचवड, सोलापूर येथील परीक्षार्थीचा समावेश आहे.


हेही वाचा

परदेशात जाणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी नवी मुंबईत १६ जूनला विशेष लसीकरण सत्र

व्हॅक्सीनेशन सर्टिफिकेट सोशल मीडियावर शेअर करताय? मग सावधान...

पुढील बातमी
इतर बातम्या