Advertisement

परदेशात जाणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी नवी मुंबईत १६ जूनला विशेष लसीकरण सत्र

महापालिका आयुक्त अभिजीत बांगर यांच्या मार्गदर्शनाखाली उच्च शिक्षणासाठी परदेशी जाणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी ३१ मे व ३ जून रोजी दोन वेळा विशेष लसीकरण सत्रे आयोजित करण्यात आली होती.

परदेशात जाणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी नवी मुंबईत १६ जूनला विशेष लसीकरण सत्र
SHARES

उच्च शिक्षणासाठी परदेशी जाणाऱ्या विद्यार्थ्यांचं (student) कोविड लसीकरण न झाल्यामुळे अडचण होऊ नये व त्यांची शैक्षणिक संधी वाया जाऊ नये यासाठी नवी मुंबई महापालिकेने (Navi Mumbai Municipal Corporation) बुधवारी १६ जून रोजी विशेष लसीकरण सत्र (Special vaccination session ) आय़ोजीत केलं आहे. त्यानुसार सकाळी ९ ते ५ या वेळेत सेक्टर १५ नेरुळ येथील माँसाहेब मिनाताई ठाकरे रुग्णालयात परदेशी जाणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी हे विशेष लसीकरण सत्र होणार आहे.

महापालिका आयुक्त अभिजीत बांगर यांच्या मार्गदर्शनाखाली उच्च शिक्षणासाठी परदेशी जाणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी ३१ मे व ३ जून रोजी दोन वेळा विशेष लसीकरण सत्रे आयोजित करण्यात आली होती. याचा लाभ परदेशी विद्यापीठात प्रवेश मिळालेल्या ३१९ विद्यार्थ्यांनी घेतला होता. मात्र, काही विद्यार्थ्यांकडून पुन्हा लसीकरण सत्र आयोजीत करावे अशी मागणी करण्यात येत होती. त्यामुळे आता पालिका १६ जून रोजी विद्यार्थ्यांचं लसीकरण करणार आहे. 

ज्या विद्यार्थ्यांना उच्चशिक्षणासाठी परदेशी जायचे आहे अशा १८ ते ४४ वयोगटातील विद्यार्थ्यांनी लसीकरणासाठी येताना सोबत आवश्यक वैध पुरावे म्हणजेच परदेशी विद्यापीठात प्रवेश मिळाल्याचे निश्चिती पत्र, परदेशी व्हिसा आणि सदर व्हिसा मिळण्यासाठी संबंधीत विद्यापीठाकडून प्राप्त झालेले I-20 किंवा DS -160 फॉर्म इ. कागदपत्रे सोबत आणणे बंधनकारक आहे.

नवी मुंबई महापालिका क्षेत्रातील उच्चशिक्षणासाठी परदेशात जाऊ इच्छिणा-या वय वर्ष १८ ते ४४ वयोगटातील विद्यार्थ्यांनी या विशेष लसीकरण सत्राचा लाभ घ्यावा असं आवाहन महापालिका आयुक्त अभिजीत बांगर यांनी केलं आहे.हेही वाचा -

मुंबईतील झोपडपट्ट्या कोरोनामुक्तीच्या मार्गावर

राजकीय जाहिरातींना लसीकरण केंद्रांवर मनाई

Read this story in English
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा