Advertisement

परदेशात शिक्षणासाठी जाणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी नवी मुंबईत १ जूनला विशेष लसीकरण सत्र

परदेशातील विद्यापीठांमध्ये उच्च शिक्षणासाठी प्रवेश मिळालेल्या विद्यार्थ्यांची लसीकरणाअभावी शैक्षणिक संधी वाया जाऊ नये यासाठी विशेष लसीकरण सत्र होणार आहे.

परदेशात शिक्षणासाठी जाणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी नवी मुंबईत १ जूनला विशेष लसीकरण सत्र
SHARES

परदेशात शिक्षणासाठी जाणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी नवी मुंबईत (navi mumbai) १ जूनला विशेष लसीकरण सत्र (special corona vaccination session) पालिकेने आयोजीत केलं आहे. सकाळी ९ ते ५ या वेळेत सेक्टर १५ नेरुळ येथील माँसाहेब मिनाताई ठाकरे रुग्णालयात हे विशेष लसीकरण सत्र होणार आहे. 

परदेशातील विद्यापीठांमध्ये उच्च शिक्षणासाठी प्रवेश मिळालेल्या विद्यार्थ्यांची लसीकरणाअभावी शैक्षणिक संधी वाया जाऊ नये यासाठी विशेष लसीकरण सत्र होणार आहे.  १८ ते ४४ वयोगटातील ज्या विद्यार्थ्यांना उच्चशिक्षणासाठी परदेशी जायचे आहे त्यांनी या विशेष लसीकरण सत्रात येऊन लसीकरण करून घ्यावे असं आवाहन नवी मुंबई महापालिकेने केलं आहे. 

लसीकरणासाठी येताना सोबत आवश्यक वैध पुरावे म्हणजेच परदेशी विद्यापीठात प्रवेश मिळाल्याचे निश्चिती पत्र, परदेशी व्हिसा आणि सदर व्हिसा मिळण्यासाठी संबंधीत विद्यापीठाकडून प्राप्त झालेले I-20 किंवा DS -160 फॉर्म इ. कागदपत्रे सोबत आणणं बंधनकारक आहे.

दरम्यान, नवी मुंबई महापालिकेने (Navi Mumbai Municipal Corporation) कोरोनावरील लस (corona vaccine) खरेदी करण्यासाठी जागतिक निविदा काढली आहे. याअंतर्गत चार लाख लस कुप्या खरेदी करण्यात येणार आहेत. पालिकेने दर दिवशी २५ हजार नागरिकांचं लसीकरण करण्याचं लक्ष्य ठेवलं आहे. यासाठी लसीकरण केंद्र (vaccination centres) वाढविण्यात येणार आहेत. शहरातील प्रत्येक प्रभागात केंद्र निर्माण करण्यात येणार आहे.



हेही वाचा -

राज्यात १५ जूनपर्यंत लॉकडाऊन वाढला; पाहा काय बंद काय सुरू?

कोरोनाची संभाव्य तिसरी लाट रोखण्यासाठी गावकऱ्यांनी पुढे यावे- मुख्यमंत्री

Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा