Advertisement

राजकीय जाहिरातींना लसीकरण केंद्रांवर मनाई

महापालिकेच्या लसीकरण केंद्रांबरोबरच शासकीय तसेच खासगी किंवा औद्योगिक लसीकरण केंद्राबाहेरही राजकीय पक्षांचे फलक, जाहिराती, भित्तीचित्रे लावण्यास पालिका प्रशासनानं मनाई केली आहे.

राजकीय जाहिरातींना लसीकरण केंद्रांवर मनाई
SHARES

महापालिकेच्या लसीकरण केंद्रांबरोबरच शासकीय तसेच खासगी किंवा औद्योगिक लसीकरण केंद्राबाहेरही राजकीय पक्षांचे फलक, जाहिराती, भित्तीचित्रे लावण्यास पालिका प्रशासनानं मनाई केली आहे. या नियमांचं उल्लंघन करणाऱ्या केंद्रांची मान्यता रद्द करण्यात येईल, असाही इशारा पालिका आयुक्त इक्बाल सिंह चहल यांनी दिला आहे.

महापालिकेच्या लसीकरण केंद्रावर कोणत्याही पक्षाने जाहिरात करणारी किंवा श्रेय घेणारी फलकबाजी लावू नये असे आदेश पालिका आयुक्तांनी ३ जून रोजी काढले होते. मात्र गेल्या १० दिवसात त्यात काही फरक पडला नाही. अनेक ठिकाणी लसीकरण केंद्रांच्या बाहेर राजकीय फलक दिसत आहेत. त्यामुळे पालिका आयुक्तांनी सोमवारी पुन्हा एकदा परिपत्रक काढून राजकीय फलकबाजी बंद करण्याचा इशारा दिला आहे.

आयुक्तांनी दिलेल्या सूचनांचे सतत उल्लंघन होत असल्यामुळे आयुक्तांनी अधिक कडक मार्गदर्शक सूचना लसीकरण केंद्रांना आखून दिल्या आहेत. राजकीय फायद्यासाठी अशा जाहिराती करणे उचित नाही, असेही आयुक्तांनी म्हटले आहे. महापालिका, शासकीय अथवा खासगी लसीकरण केंद्र, तसेच औद्योगिक संस्था (विविध कं पन्या व कार्यालये) व गृहसंकु ल येथेही खासगी लसीकरण उपकेंद्रांवर राजकीय जाहिराती, भित्तिपत्रे लावण्यास मनाई करण्यात आली आहे.

काही लोकप्रतिनिधी खासगी लसीकरण केंद्र आणि गृहनिर्माण संस्था व खासगी कं पन्या यांच्यात समन्वय साधून श्रेय घेत आहेत. त्यावर अंकुश आणण्याचा प्रयत्न आयुक्तांनी केला आहे. खासगी लसीकरण केंद्रांना गृहनिर्माण संस्था किं वा औद्योगिक संस्थांमध्ये लसीकरण करण्याची परवानगी देण्यात आली आहे. मात्र या केंद्रांनी संस्थांशी सामंजस्य करार करावा, असे निर्देश देण्यात आले आहेत. या करारात खासगी लसीकरण केंद्रामार्फत उपलब्ध असलेले वैद्यकीय कर्मचारी, रुग्णवाहिके ची व्यवस्था याबाबत स्पष्टपणे उल्लेख करावा, असेही निर्देश देण्यात आले आहेत.हेही वाचा

संजय गांधी नॅशनल पार्क सर्वांसाठी पुन्हा खुले, 'या' वेळेत जाण्याची परवानगी

मुंबईचा डबेवाला लवकरच सुरू करणार सेंट्रल किचन, 'अशी' आहे योजना

Read this story in हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा