Advertisement

संजय गांधी नॅशनल पार्क सर्वांसाठी पुन्हा खुले, 'या' वेळेत जाण्याची परवानगी

बोरिवलीच्या SGNP अधिकाऱ्यांनी आता १५ जून २०२१ पासून हे गेट पुन्हा सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे.

संजय गांधी नॅशनल पार्क सर्वांसाठी पुन्हा खुले, 'या' वेळेत जाण्याची परवानगी
SHARES

मुंबईचे लोकप्रिय संजय गांधी राष्ट्रीय उद्यान  (SGNP) गेल्या काही आठवड्यांपासून कोरोनव्हायरसमुळे बंद ठेवण्यात आले होते. कोरोनावरील मार्गदर्शक तत्त्वे आणि वाढती प्रकरणं लक्षात घेऊन आधी हा निर्णय घेण्यात आला होता. अहवालानुसार, बोरिवलीच्या SGNP अधिकाऱ्यांनी आता १५ जून २०२१ पासून हे गेट पुन्हा सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे.

उद्यान दिवसातील काही तास खुले राहिल. पहाटे ५ ते ७.३० आणि सकाळी ७.३० ते ९ या वेळेत खुले राहील. पहिला स्लॉट अशा लोकांसाठी असेल ज्यांना उद्यानात फिरण्याची इच्छा आहे. तर दुसरा स्लॉट ज्यांना सर्वसाधारणपणे सायकल चालवण्यासाठी आणि उद्यानास जाण्याची इच्छा आहे त्यांच्यासाठी नियुक्त केले जाईल.

दरम्यान, सफारी आणि बचाव केंद्र हे प्राणी सुरक्षितता लक्षात घेऊन बंद राहील.

मिशन ब्रेक द चेन अंतर्गत तयार करण्यात आलेल्या नवीन अनलॉकिंग उपक्रमानुसार सरकारनं दिलेल्या मार्गदर्शक सूचनांच्या आधारे हा निर्णय घेण्यात आला. हे पार्क बर्‍याच लोकांच्या व्यवस्थापनासाठी तयार आहे. २०२० च्या लॉकडाऊननंतर SNGPचे गेट उघडण्यात आले होते. तेव्हा नागरिकांनी चांगलीच गर्दी केली होती. त्यानंतर महिनाभर तरी SGNP खुले ठेवण्यात आले होते.

दरम्यान, महाराष्ट्रात (maharashtra) सोमवारी नवीन कोरोना (coronavirus) रुग्णांच्या संख्येत मोठी घट झाली आहे. राज्यात दिवसभरात ८ हजार १२९ नवीन रुग्ण आढळले आहेत. तर १४ हजार ७३२ रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. तसंच २०० कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

राज्यात आतापर्यंत एकूण ५६ लाख ५४ हजार ३ रुग्ण बरे झाले आहेत. राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९५.५५ टक्क्यांवर पोहोचलं आहे. तर राज्यातील मृत्यूदर १.९ टक्के आहे. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या ३,८२,१५,४९२ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी ५९,१७,१२१ (१५.४८ टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात ९,४९,२५१ व्यक्ती होमक्वारंटाईनमध्ये आहेत. तर ५,९९७ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.

राज्यातील अॅक्टिव्ह रुग्णांची संख्या १ लाख ४७ हजार ३५४ झाली आहे. पुणे जिल्ह्यात सक्रिय रुग्णांची संख्या सर्वाधिक १९ हजार ०४७ आहे. मुंबई पालिका हद्दीत हा आकडा १८ हजार २०५ इतका आहे. ठाणे जिल्ह्यात सध्या १५ हजार ६८६ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. तर कोल्हापुरात सक्रिय रुग्णांची संख्या १५ हजार १५६ इतकी आहे. नागपूर जिल्ह्यात ही संख्या ६ हजार २६१ आहे.



हेही वाचा

मुंबईचा डबेवाला लवकरच सुरू करणार सेंट्रल किचन, 'अशी' आहे योजना

एकविरा देवी मंदिर, राजगड किल्ल्यावर ‘रोप वे’ नं जाता येणार

Read this story in English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा