Advertisement

व्हॅक्सीनेशन सर्टिफिकेट सोशल मीडियावर शेअर करताय? मग सावधान...

लस घेतल्यानंतर सरकारकडून मिळालेले व्हॅक्सीनेशन सर्टिफिकेट बरेच जण सोशल मीडियावर शेअर करतात.

व्हॅक्सीनेशन सर्टिफिकेट सोशल मीडियावर शेअर करताय? मग सावधान...
SHARES

लस (Vaccine) घेतल्यानंतर सरकारकडून मिळालेले व्हॅक्सीनेशन सर्टिफिकेट (Vaccination certificate) बरेच जण सोशल मीडियावर (Social Media) शेअर करतात. तुम्ही अशाच लोकांपैकी असाल तर वेळीच सावधान व्हा. कारण या सर्टिफिकेटद्वारे तुमचा खासगी डेटा (Private Data) लीक होण्याची शक्यता आहे. केंद्रीय गृह मंत्रालयानं (Home ministery)याबाबत अलर्ट जारी केला आहे.

गृह मंत्रालयाकडून सांगण्यात आलं आहे की, व्हॅक्सीनेशन सर्टिफिकेटमध्ये नाव, वय, लिंग आणि पुढील डोससंबंधी तारखेसह इतर महत्वाची माहिती असते. ही माहिती गुन्हेगारांसाठी फायद्याची ठरू शकते. गृह मंत्रालयानं यासाठी आपल्या सोशल मीडिया अकाउंट (सायबर दोस्त) वर एक पोस्टरदेखील जारी केले आहे.

यात म्हटलं आहे की, सर्टिफिकेटवर असलेल्या क्यू-आर कोडला स्कॅन केल्यानंतर इतर माहितीदेखील मिळते. ही माहिती मिळवून आरोपी त्या व्यक्तीला फोन करू शकतात आणि त्यांच्याकडून इतर खासगी माहिती गोळा करू शकतात. या खासगी माहितीमध्ये फोन नंबर, ओटीपी इत्यादी माहिती असू शकते. याद्वारे तुमच्यासोबत सायबर फ्रॉड (Cyber fraud) होऊ शकतो.

याप्रकरणी जालंधरचे सायबर क्राइम एसपी रवी कुमार यांनी सांगितलं की, व्हॅक्सीनेशन सर्टिफिकेटमध्ये अनेक लोकांनी प्रूफ म्हणून पॅन आणि आधार कार्डसारके डॉक्युमेंट्स दिलेले असतात. यामुळे सायबर गुन्हेगारांकडे आपला सगळा डेटा जातो आणि फसवणूक होते.हेही वाचा

मुंबईबाहेरील खासगी रुग्णालयांना लसीकरण कॅम्प घेण्यास मनाई- महापालिका आयुक्त

घरोघरी जावून कोरोना लस देण्यासाठी केंद्र सरकारचा नकार

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा