Advertisement

लसीसाठी नोंदणी करताना घ्या ‘ही’ खबरदारी, नाहीतर CoWin ब्लॉक करेल

पोर्टलवर नोंदणी प्रक्रियेत तुमची एक छोटीशी चूक तुम्हाला महागात पडू शकते.

लसीसाठी नोंदणी करताना घ्या ‘ही’ खबरदारी, नाहीतर CoWin ब्लॉक करेल
SHARES

कोरोना लस (Corona vaccine) घेण्यासाठी भारत सरकारच्या CO-WIN पोर्टलवर नोंदणी करता येते. या पोर्टलवर नोंदणी प्रक्रियेत तुमची एक छोटीशी चूक तुम्हाला महागात पडू शकते. त्या चुकिसाठी तुम्हाला पोर्टलवर ब्लॉक (CO-WIN will block users) केलं जाईल, असं केंद्र सरकारनं सांगितलं आहे.

कोरोना लसीसाठी काही लोक वारंवार स्लॉटसाठी (Corona vaccine slot) प्रयत्न करत आहेत. अनेक वेळा ओटीपी जनरेट करत आहेत. स्लॉटसाठी २४ तासांत १००० पेक्षा जास्त वेळा प्रयत्न करणाऱ्या लोकांना आणि २४ तासांत ५० पेक्षा जास्त ओटीपी जनरेट करणाऱ्या युझर्सना को-विन पोर्टल यापुढे ब्लॉक करणार आहे.

या पोर्टलवरून संबंधित युझर्सना केवळ २४ तासांसाठीच ब्लॉक केलं जाईल. याशिवाय को-विन पोर्टलवर १५ मिनिटांत २० पेक्षा जास्त वेळा सर्च रिक्वेस्ट (search request) पाठवल्यास सिस्टम युझरला लॉग आउट (log out) करेल, असं एका अधिकाऱ्यानं टाईम्स ऑफ इंडियाशी बोलताना सांगितलं.

हा उपाय को-विन पोर्टलवर ऑटोमेट स्लॉट बुकिंगसाठी बॉट्स तसंच स्क्रिप्ट रोखण्याच्या प्रयत्नाचा एक भाग आहे असंही त्यांनी स्पष्ट केलं. बुकिंग स्लॉटला मॅन्युअलपणे करणाऱ्या लोकांना बॉट्ससोबत स्पर्धा करावी लागू नये हा यामागचा हेतू आहे.

नुकतंच केंद्र सरकारनं को-विन पोर्टलसाठी नवीन गाइडलाइन्स जारी केल्या आहेत. त्या थर्ड पार्टीला आपल्या अॅपच्या माध्यमातून रजिस्ट्रेशन (registration), शेड्यूलिंग (scheduling) आणि व्हॅक्सिनेशन मॅनेजमेंट एनेबल करण्याची परवानगी देतात. हे सध्याच्या फ्रेमवर्कसाठी एक अपडेट आहे.

यापूर्वी डेव्हलपर्स फक्त उपलब्ध असलेल्या स्लॉटबद्दलची माहिती आणि अॅपच्या माध्यमातून लसीकरण प्रमाणपत्र डाउनलोड (download of vaccination certificates) करण्याची सुविधा देऊ शकत होते.



हेही वाचा

बालकांच्या संरक्षणासाठी नवी मुंबई पालिकेकडून मोफत लसीकरण कार्यक्रम

WhatsApp वरून मिळवा कोरोना लसीची माहिती, रिलायन्सची 'ही' नवी सुविधा

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा