Advertisement

बालकांच्या संरक्षणासाठी नवी मुंबई पालिकेकडून मोफत लसीकरण कार्यक्रम

२३ नागरी प्राथमिक आरोग्य केंद्र, तसंच या केंद्रांच्या कार्यक्षेत्रात शाळा, अंगणवाडी, खाजगी दवाखाने, सोसायटी ऑफिस, पालिका रुग्णालये अशा विविध ठिकाणी बाह्य लसीकरण सत्र आयोजित करण्यात येत आहेत.

बालकांच्या संरक्षणासाठी नवी मुंबई पालिकेकडून मोफत लसीकरण कार्यक्रम
SHARES

लसीकरणाव्दारे (vaccination) अनेक आजारांना प्रतिबंध करण्यात येतो. त्यामुळे नवी मुंबई महापालिका (Navi Mumbai Municipal corporation) आरोग्य विभागाच्या वतीने ‘सार्वत्रिक लसीकरण कार्यक्रम’ (vaccination program) सुरु करण्यात आला आहे. या कार्यक्रमांतर्गत गर्भवती माता, नवजात बालके, दोन वर्षाच्या आतील बालके, ५, १० व १६ वर्षांची मुले / मुली (children) यांना लसीकरण करण्यात येत आहे.

सार्वत्रिक लसीकरण कार्यक्रमांतर्गत ९ महिने पूर्ण झालेल्या बालकाला गोवर रुबेला लसीचा पहिला डोस तसेच १६ महिने पूर्ण झालेल्या बालकाला गोवर रुबेला लसीचा दुसरा डोस देण्यात येतो. गोवर रुबेला लसीमुळे न्युमोनिया व त्यामुळे होणारी गुंतागुंत / मृत्यू यापासून बालकाचा बचाव होतो. त्याचप्रमाणे बालकांना इन्फ्युएन्झा लस देण्याचे नियोजन करण्यात येत असून महापालिका क्षेत्रात इन्फ्युएन्झाकरिता सार्वत्रिक लसीकरण मोहीम राबविण्यात येणार आहे.

२३ नागरी प्राथमिक आरोग्य केंद्र, तसंच या केंद्रांच्या कार्यक्षेत्रात शाळा, अंगणवाडी, खाजगी दवाखाने, सोसायटी ऑफिस, पालिका रुग्णालये अशा विविध ठिकाणी बाह्य लसीकरण सत्र आयोजित करण्यात येत आहेत.  याशिवाय दगडखाणी, बांधकामे, विरळ झोपडपट्या अशा ठिकाणीही मोबाईल सत्रे आयोजित करण्यात आली आहे. महापालिका कार्यक्षेत्रात प्रत्येक महिन्याला ३०१ बाह्य संपर्क सत्रे, १३९ स्थायी सत्रे व ३० मोबाईल सत्रे अशा एकूण ४६९ सत्रांव्दारे लसीकरण करण्यात येत आहे.  

कोरोनाच्या तिसऱ्या लाटेमध्ये लहान बालकांना संसर्ग होण्याचा धोका मोठ्या प्रमाणात आहे अशी शक्यता वर्तविली जात आहे. या पार्श्वभूमीवर गोवरच्या बालकांच्या प्रकृतीत गुंतागुत होणाऱ्या न्युमोनियापासून संरक्षण होण्यासाठी पालकांनी आपल्या दोन वर्षांपर्यंतच्या बालकाला वयानुसार पहिला आणि दुसरा डोस देऊन सुरक्षित करावे असे आवाहन महापालिका आयुक्त अभिजीत बांगर यांनी केलं आहे. 

लाभार्थ्यांने प्रत्येक वेळी घ्यावयाच्या विविध लसी 

अ.क्र.

लस

लस कधी द्यावी

टी.डी. -१

गरोदरपणाच्या सुरुवातीला

टी.डी. -२

टी.डी. १ दिल्यानंतर ४ आठवडयांनी

टी.डी.- बूस्टर

जर माता मागील टी.डी. दिल्यानंतर ३ वर्षाच्या आत गरोदर राहिल्यास

बी.सी.जी.

जन्मतः, शक्य तितक्या लवकर, एक वर्ष पूर्ण होण्या आधी

हिपॅटायटिस़-बी जन्मतः

जन्मल्यानंतर २४ तासाच्या आत

ओ.पी.व्ही. झिरोमात्रा

जन्मतः, शक्य तितक्या लवकर, १४ दिवसापर्यंत

ओ.पी.व्ही. १,२ व ३

जन्मल्यानंतर ६, १० व १४ वा आठवडा पूर्ण झाल्यावर

पेंटाव्हॅलंट १,२ व ३

जन्मल्यानंतर ६, १० व १४ वा आठवडा पूर्ण झाल्यावर

गोवर रुबेला

जन्मल्यानंतर ९ महिने पूर्ण झाल्यावर, १ वर्ष पूर्ण होण्याआधी

१०

जीवनसत्व- अ- १

जन्मल्यानंतर ९ महिने पूर्ण झाल्यावर, गोवर लसी बरोबर

११

डी.पी.टी. बूस्टर

१६ ते २४ महिने

१२

ओ.पी.व्‍ही. बूस्टर

१६ ते २४ महिने

१३

गोवर रुबेला बूस्टर

१६ ते २४ महिने

१४ 

जीवनसत्व- अ- २ ते ९

१६ महिने व नंतर प्रत्येक सहा-सहा महिन्याने ५ वर्षे पूर्ण होईपर्यंत

१५   

डी.पी.टी. बूस्टर

५ ते ६ वर्षे

१६  

टी.डी.

१० व १६ वर्षे



हेही वाचा -

पुढचे ३ दिवस धोक्याचे, मुंबईसह नवी मुंबईत मुसळधार

नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला बाळासाहेब ठाकरेंचंच नाव- एकनाथ शिंदे

Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा