Advertisement

नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला बाळासाहेब ठाकरेंचंच नाव- एकनाथ शिंदे

नवी मुंबईतील आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या नावावरून मोठा वाद उभा राहिला आहे. विमानतळाला दि. बा. पाटील यांचं नाव देण्याची मागणी होत असून, या मागणीनं आता जोर धरला आहे.

नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला बाळासाहेब ठाकरेंचंच नाव- एकनाथ शिंदे
SHARES

नवी मुंबईतील (navi mumbai) आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या नावावरून मोठा वाद उभा राहिला आहे. विमानतळाला दि. बा. पाटील यांचं नाव देण्याची मागणी होत असून, या मागणीनं आता जोर धरला आहे. यासाठी नवी मुंबईसह पनवेल, कल्याण, ठाणे, रायगड भागातील नागरिक आंदोलन करत आहेत. या परिसरातील नागरिक रस्त्यावर उतरले असून, त्यांनी विमानतळाला दि. बा. पाटील यांचं नाव देण्याची मागणी केली. मात्र, शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे (balasaheb thackeray) यांचं नाव देण्यावर शिवसेना ठाम आहे. दरम्यान, विमानतळाला बाळासाहेब ठाकरे यांचं नाव दिलं जाणार असल्याचं शिवसेनेचे नेते आणि नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी स्पष्ट केलं.

राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे (eknath shinde) यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी एकनाथ शिंदे यांनी 'नवी मुंबईतील विमानतळाला शिवसेनाप्रमुख (shiv sena) बाळासाहेब ठाकरे यांचे नाव देण्यात येईल. तर भविष्यातील दुसऱ्या मोठ्या प्रकल्पाला दिवंगत खासदार दि. बा. पाटील यांचं नाव दिले जाईल, असे आश्वासन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी संघर्ष समितीला दिले आहे', अशी माहितीही एकनाथ शिंदे यांनी दिली.

'पूर्वी जर कोणाचे नाव दिले असते, आणि ते नाव काढून आम्ही शिवसेनाप्रमुखांचे नाव सुचवले असते, तर ते योग्य नव्हते. आम्ही दि. बा. पाटील यांचा आदर करतो. दि. बा. पाटील कृती समितीने दुसऱ्या प्रकल्पासाठी नाव सुचवावे, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (uddhav thackeray) यांनी सांगितले आहे', अशी माहिती शिंदे यांनी दिली. 'यासंदर्भात कृती समितीसोबत एक बैठक झाली आहे. आणखी एक बैठक होणार आहे. त्यातून सकारात्मक निर्णय होईल', असा विश्वासही यावेळी एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केला.

नवी मुंबईतील प्रस्तावित विमानतळाला दिवंगत खासदार दि. बा. पाटील यांचे नाव देण्याची मागणी होत आहे. या मागणीसाठी नवी मुंबई, ठाणे, पनवेल, कल्याण, रायगडमधील भूमिपुत्रांनी आंदोलन उभारले आहे. मुंबईसह इतर भागात मानवी साखळी तयार करण्यात आली होती. राज्यातील विविध संघटना व काही राजकीय पक्षांनीही या मागणीला पाठिंबा दिला आहे.



हेही वाचा -

आरक्षणप्रश्नी शरद पवार यांनी केली भूमिका स्पष्ट, म्हणाले...

पुढील विधानसभा, लोकसभेतही राष्ट्रवादी-शिवसेना आघाडी?, शरद पवारांचं महत्त्वाचं वक्तव्य


Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा