Advertisement
COVID-19 CASES IN MAHARASHTRA
Total:
59,17,121
Recovered:
56,54,003
Deaths:
1,12,696
LATEST COVID-19 INFORMATION  →

Active Cases
Cases in last 1 day
Mumbai
15,390
575
Maharashtra
1,47,354
9,350

पुढचे ३ दिवस धोक्याचे, मुंबईसह नवी मुंबईत मुसळधार

हवामान विभागानं मुंबई, ठाण्यासह कोकणात ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. तर संपूर्ण महाराष्ट्रात अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे.

पुढचे ३ दिवस धोक्याचे, मुंबईसह नवी मुंबईत मुसळधार
SHARES

मुंबई (mumbai rains) शहरासह पश्चिम उपनगरात पहाटेपासून मुसळधार पावसाची सुरुवात झाली आहे. मागील २ दिवसांत पावसानं अधिक जोर पकडला आहे. त्यामुळं मुंबईतील हिंदमाता, परेल, सायन, किंग्ज सर्कल यासारख्या सखल भागात मोठ्या प्रमाणावर पाणी साचण्यास सुरुवात झाली आहे. शिवाय, हवामान विभागानं मुंबई, ठाण्यासह कोकणात ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. तर संपूर्ण महाराष्ट्रात अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे.

मुंबईसह पश्चिम उपनगरात पहाटेपासून पावसाची संततधार पाहायला मिळत आहेत. मुंबईतील दादर, वरळी, लोअर परेल, मरिन ड्राईव्ह यासारख्या अनेक ठिकाणी पाऊस दिसत आहे. तर मुंबईच्या पश्चिम उपनगरात अंधेरी, बोरिवली, कांदिवली या ठिकाणीही मुसळधार पाऊस कोसळत आहे. पहाटेपासून कोसळणाऱ्या पावसामुळं मुंबईत ठिकठिकाणी पाणी साचलं आहे.

मुंबईतील हिंदमाता, परेल, सायन, किंग्ज सर्कल या सखल भागात नेहमीप्रमाणे पाणी साचलं आहे. तर मुंबईच्या पश्चिम उपनगरात अंधेरी सबवे हा सखल भाग असल्यामुळे तिथे दोन ते तीन फूट पाणी साचले आहे. त्यामुळे अंधेरी सबवे वाहनांसाठी आणि नागरिकांसाठी पूर्णपणे बंद करण्यात आला आहे.

पुढचे ३ दिवस महाराष्ट्रासाठी (maharashtra) धोक्याचे असल्याचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, येत्या तीन दिवसात कोकण, मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रात अतिवृष्टी होऊ शकते, असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. तर मुंबई, ठाण्यासह कोकणात ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. त्याशिवाय नाशिक, धुळे, नंदुरबारमध्ये यलो अलर्ट घोषित केला आहे. तसेच संपूर्ण महाराष्ट्रात अतिवृष्टीचा इशारा दिला आहे.

नवी मुंबईतही (navi mumbai) पहाटेपासून मुसळधार पावसाला सुरुवात झाली आहे. रात्री नवी मुंबईत पावसाने काहीशी विश्रांती घेतली होती. मात्र, पहाटे पावसाचा जोर पुन्हा वाढला. त्यामुळे नवी मुंबईत पावसासह सर्वत्र धुके पसरलं आहे. नवी मुंबई, पनवेलमधील काही शहरात तुरळक पाऊस होत आहे. तर काही ठिकाणी जोरदार पावसाने हजेरी लावली आहे.हेही वाचा -

Mumbai Rains: मुंबईत विजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस

हार्बर मार्गावरील चुनाभट्टी स्थानकातील पाणी ओसरण्यास १५ तास


Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा